Share

डिपीडीसीसाठी पुणे महापालिकेच्या 28 नगरसेवकांचे अर्ज दाखल

Published On: 

🕒 1 min read

पुणे : जिल्हा नियोजन समितीवरील (डिपीडीसी) सदस्यपदाच्या 21 जागांसाठी महापालिकेच्या 28 नगरसेवकांनी अर्ज भरले आहेत. अर्ज माघारीची मुदत आठ सप्टेंबर असून 18 सप्टेंबरला मतदान होणार आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतून एकूण 21 सदस्य डीपीडीसीवर नियुक्त होणार आहेत. त्यात पुणे महापालिकेतून 11 किंवा 14 सदस्य नियुक्त होण्याची शक्‍यता आहे. पुणे महापालिकेतील सुमारे 28 नगरसेवकांनी सदस्यत्त्वासाठी अर्ज भरले आहेत. 29 ऑगस्ट रोजी छाननी होणार असून त्यानंतर माघारीच्या तारखेपर्यंत या बाबतचा निर्णय होईल, अशी माहिती सभागृहनेते श्रीनाथ भिमाले आणि विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी दिली.

21 सदस्यांत 11 महिला, सहा इतर मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) आणि तीन अनुसूचित जातीसाठी (एससी) राखीव आहेत. डिपीडीसीवर सदस्य नियुक्तीसाठी राजकीय सहमतीने निर्णय व्हावा, असा विरोधी पक्षांचा सूर आहे. त्यासाठी भाजपने 13 सदस्य, राष्ट्रवादी कॉंग्रेसने 6 आणि कॉंग्रेस, शिवसेनेचा प्रत्येकी एक सदस्य असावा, असे त्यांचे म्हणणे आहे. तर, सत्ताधारी भाजप 14 किंवा 15 जागांवर दावा करण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे राजकीय सहमती न झाल्यास 18 सप्टेंबरला मतदान होईल.

भाजपकडून वीरसेन जगताप, सरस्वती शेंडगे, राजू लायगुडे, जयंत भावे, उमेश गायकवाड, अजय खेडेकर, मनीषा कदम, शीतल सावंत, वृषाली चौधरी, ज्योती गोसावी, धनराज घोगरे, दीपक पोटे, स्वप्नाली सायकर आणि गायत्री खडके-सूर्यवंशी यांनी अर्ज गुरुवारी दाखल केले.तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून ऍड. भैय्यासाहेब जाधवफूर पठाण, दत्तात्रेय धनकवडे, वैशाली बनकर, सुमन पठारे, सचिन दोडके, विशाल तांबे, दीपाली धुमाळ, अमृता बाबर यांनी अर्ज दाखल केले आहेत. कॉंग्रेसकडून रवींद्र धंगेकर, चांदबी नदाफ, वैशाली मराठे आणि शिवसेनेतर्फे अविनाश साळवे, पल्लवी जावळे यांनी अर्ज दाखल केले आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!