Share

४० जवानांचे हौतात्म्याने देश शोकसागरात,राज ठाकरे म्हणतात हे तर राजकीय बळी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा- पुलवामा येथे झालेल्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मात्र ४० जवानांचे बलिदान हे राजकीय बळी असल्याचा आरोप केला आहे. ठाकरे यांच्या या विधानामुळे मोठा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

निवडणुकांच्या तोंडावर पुलवामासारखे हल्ले घडवून आणायचे ही नीती अमेरिका अनेक वर्षांपासून अवलंबत असल्याचेही राज यावेळी म्हणाले. राज ठाकरे यांनी कोल्हापूरातील एका कार्यक्रमात बोलताना हा गंभीर आरोप केला.

पुलवामात हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी जीम कार्बेट पार्कमध्ये शूटिंग करत होते. या घटनेबाबत कळूनही त्यांनी शूटिंग थांबवले नाही, असा आरोप राज यांनी केला. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांची चौकशी केल्यास सर्वच गोष्टी बाहेर येतील, असं वक्तव्यही त्यांनी केलं.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!