परभणी : कोरोना व्हायरस हे जागतिक संकट भारतात पाय पसरवत असतांनाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत परभणी जिल्यातील जिंतूर तालुक्यात कडकडीत बंद पाहायला मिळाला. कोरोना व्हायरसची दहशद ग्रामीण भागात जास्त प्रमाणात पाहायला मिळाली. कोरोना मुळे देशात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
त्यातच शहरी भागात कोरोना व्हायरस संबंधी माहिती आणि त्यावर काळजी कशी घ्यावी याबाबत जनजागृती होत असतांना ग्रामीण भागात मात्र कोणतीही तयारी प्रशासनाकडून केलेली नाही. तरीही ग्रामीण जनता स्वतः कोरोणा बाबत सतर्क असल्याचे पाहायला मिळते आहे. टीव्ही बातम्या मध्ये सांगितल्या प्रमाणे काळजी गावातली जनता घेऊ लागलीय. त्याचबरोबर कोरोना बाबत गावात अनेक अफवेचे पेव फुटलेले पाहायला मिळाले. ग्रामीण भागात जनजागृती न झाल्याचा हा परिणाम आहे.
ग्रामीण भागात कर्फ्यु जोरात….
ग्रामीण भागाच्या जनता कर्फ्युचा आढावा घेतला असता. जिंतूर तालुक्यातील आंबरवाडी या गावामध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. गावातील सगळे लोकं घरात बसून आहेत. आज शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांचं प्रमाण बोटावर मोजण्या इतकं आहे. घरात बसून टिव्ही पाहणं गावकऱ्यांनी पसंद केलंय. रोजच्या तुलनेत गावात शांतता पाहायला मिळाली. गावातील छोटीमोठी किराणा दुकाने, टपऱ्या, पिठाच्या गिरण्या, इत्यादी पूर्णतः बंद आहे.
त्याचबरोबर आज चौकाचौकातील गप्पांसाठी जमणारी माणसं, खेळणारी मुलं, वोसरी वर बसलेल्या महिला, बसस्टँड वर बिड्या फुकत बसलेली मंडळी हे सगळं आज दिसत नाही. कोणत्याही पूर्व कल्पनेशिवाय फक्त फोन आणि टिव्ही वरील बातम्यांचा हा परिणाम आहे. कोरोना या विषाणूचा मोठा धसका गावकऱ्यांनी घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
गावकऱ्यांशी बातचीत केली असता. कोरोना व्हायरस ने जगणं हराम केल्याची भावना गावातील लोकांमध्ये आहे. हे संकट लवकर जावो यासाठी देवाला प्रार्थना करत असल्याचंही गावकऱ्यांनी सांगितलं. ग्रामीण भागातील जनता गाफील नसून, शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात जनता कर्फ्यु कडकडीत पाळला जात आहे. हे दृश्य कोरोना व्हायरसशी दोन हात करतांना सुखावह ठरलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

