पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतामध्ये कोरोना व्हायरस च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आजच्या दिवशी देशवासियांना सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत जनता कर्फ्यु पाळायला सांगितला होता. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात आज शांतता पसरलेली आहे. कोरोना चा जीवघेणा विषाणू आता भारतामध्ये हाहाकार माजवताना दिसून येत आहे. यामुळेच जनसामान्यांनी सध्या घरात बसनेच पसंत केले आहे.
शहरात राहणारे लोक आपले घर बंद करून दिवसभर घरात बसून दिवस घालवू शकतात परंतु ग्रामीण भागामध्ये, गाव-खेड्यात लोक किती वेळ घरात बसू शकतील असा प्रश्न अधिकांना पडला होता.
परंतु सध्या ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण पसरलेले दिसून येत आहे पुरंदर तालुक्यातील वाल्हे आणि वाल्हे परिसरातील जवळपास सर्वच दुकानदारांनी दुकाने बंद ठेवणे व नागरिकांनी घरात बसणेचं पसंद केलेले आहे असे पाहायला मिळत आहे.
नेहमीच गजबजलेला असलेला गांधी चौकात देखील भयावक शांतता पाहायला मिळत होती.
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबा जेजुरी, महर्षी वाल्मिकी ऋषींची समाधी असणारे वाल्हे, आणि नीरा परिसरातील नागरीकांनी आज संपूर्ण 100% बंद केले आहे व इथून पुढे देखील गरज भासल्यास अशाच प्रकारचा बंद ठेवण्यात येईल अशा प्रकारचे संदेश जेजुरी पोलीस ठाण्याचे एपीआय अंकुश माने यांनी महाराष्ट्र देशा सोबत बोलताना दिले त्याचबरोबर या परिसरामध्ये अशा प्रकारचा कोणताही रुग्ण व लक्षणे अजून तरी आढळून आले नसल्याचे देखील त्यांनी सांगितले.


