पिंपरी-चिंचवड : जगभरात कोरोनामुळे दहशतीचे वातावरण आहे. राज्यात देखील कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी शासन सर्व स्तरावर प्रयत्न करत आहे. कोरोनावर मात करता येईल पण त्यासाठी संपूर्ण देशाने एकत्र येत आलेल्या परिस्थितीचा सामना करणे महत्त्वाचे आहे, त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवारी) सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यत जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. सरकारच्या या देशभरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आणि त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनता कर्फ्यू चे आवाहन केले होते.या आवाहनला पिंपरी-चिंचवडकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या शहरामधल्या संपुर्ण भागात प्रमुख रस्त्यांसोबतच प्रत्येक गल्ली बोळात एकदम शांत वातावरण असल्याचे दिसुन येतेय.
पिंपरी-चिंचवड मध्ये सुरुवातीला राज्यातील उचांक रुग्ण आढळले होते, त्यामुळेच मुंबई, पुण्यासह, पिंपरी-चिंचवड कडे देशाचे लक्ष असेल. दुकानातली गडबड, गाड्यांची वर्दळ पुर्णपणे बंद असल्याने पहाटे ऐकू येणारा पक्ष्यांचा किलबिलाट सकाळी ११ वाजता सुद्धा लोक अनुभवत आहेत.
त्याचप्रमाणे चौका-चौकात पोलीस तैनात असून लोकांनी स्वयं-स्फूर्तीने बंद पाळल्याचे दिसून येत असून कोणतीही अफवा न पसरवण्याचे आवाहन पोलीस व्हॅन मार्फत करत आहेत.
तसेच भागातील सोसायटी, मंडळ यांनी पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार राष्ट्राला कोरोना विरुद्ध लढण्यासाठी दिलेल्या सेवेला ऋण व्यक्त करण्यासाठी बाल्कनी , टेरेस वर येऊन आभार व्यक्त करण्यासाठी व्हाट्सअप व सोशल मीडिया च्या मार्फत संदेश पोहोचवला जात आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

