Share

जनता कर्फ्यू : पुण्यात्त २५ टक्के पीएमपीएल बसेस धावत आहेत त्या सुद्धा विना प्रवासी

Published On: 

पुणे : जगभरात कोरोनामुळे दहशतीचे वातावरण आहे. राज्यात देखील कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी शासन सर्व स्तरावर प्रयत्न करत आहे. कोरोनावर मात करता येईल पण त्यासाठी संपूर्ण देशाने एकत्र येत आलेल्या परिस्थितीचा सामना करणे महत्त्वाचे आहे, त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवारी) सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यत जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. सरकारच्या या देशभरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमधील बससेवा आज फक्त पंचवीस टक्के रस्त्यांवर धावणार आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा देणारे पोलीस कर्मचारी डॉक्टर्स, नर्सेस,अग्निशामक दलाचे कर्मचारी यांच्यासाठी ही सेवा सुरू राहणार आहे मात्र नागरिकांसाठीही सेवा देण्यात येणार नाहीये त्यामुळे पुणे शहरातील ज्या बसेस रस्त्यांवर धावत आहेत त्या संपूर्णपणे रिकाम्या धावत आहेत.

दरम्यान, कोरोनाच्या पाशर््वभूमीवर पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरात आज केवळ २५ टक्के बसेस संचलनात ठेवण्यात येणार आहेत. देशभरात जनता कफ्र्युचे नियोजन असले तरी, दोन्ही महापालिकेतील कर्मचारी, शासकीय विभाग आणि इतर काही तातडीच्या कामासाठी या बसेस सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती पीएमपीएल प्रशासनाकडून काल देण्यात आली होती.

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग विचारात घेता शासनाने आज देशभरात जनता कफ्र्यु पाळण्याचे नियोजन केले आहे. यातच वाढत्या संसर्गामुळे लोक घराबाहेर पडत नाहीत. यामुळे मागील काही दिवसांपासून पीएमपीएलच्या बसेस संचलनात आणण्याचे प्रमाण कमी करण्यात येत आहे.

शनिवारी (दि.२१) सकाळपाळीत प्रशासनाने केवळ ४६३ बसेस मार्गावर सोडल्या. पुणे आणि पिंपरीतील १३ डेपोतील बसेसचा यात समावेश आहे. हेच प्रमाण रविवारी देखील कायम ठेवण्यात येणार आहे. जनता कफ्र्यु पाळण्यात येणार असल्याने नागरिक घराबाहेर पडण्याची शक्यता कमी आहे. मात्र, सरकारी कार्यालयातील कर्मचारी, दोन्ही महापालिकेतील कर्मचारी आणि इतर तातडीच्या सेवेसाठी ही सेवा सुरु राहणार आहे, अशी माहिती पीएमपीएलच्या वाहतूक विभागाकडतून देण्यात आली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!