🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : पुर्वीचा दुष्काळ आणि त्यानंतर आलेल्या परतीच्या पावसामूळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यात जिल्ह्यातील फळबागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना तातडीने आर्थिक मदत द्या अशी मागणी माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.
राज्यात 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचे सरकार स्थापन झाले होते. फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून निवडूण आलेले भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची तेव्हा विधानसभेचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली होती. युती सरकारच्या पाच वर्षात बागडे यांनी सभागृह अत्यंत शिस्तीत चालवले. गोंधळी आमदारांना दराडवत तर कधी आपल्याच सरकारला आदेश देत बागडे यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळात आपली छाप पाडली.
दरम्यान नागपूर हिवाळी अधिवेशनात हरिभाऊ बागडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र पाठवून जिल्ह्यातील फळबाग शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फळबाग शेतकरी आहेत. प्रामुख्याने ते डाळिंब, द्राक्ष, मोसंबी, जांब अशी पिके घेतात.
या वर्षी ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि धुक्यामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. फळबागे प्रमाणेच अन्य शेतकऱ्यांच्या पिकांचे देखील नुकसान झाले आहे. परंतु त्यांना अद्याप शासनाकडून कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत- नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. त्यांना तातडीने भरपाई देण्यासाठी संबंधितांना निर्देश द्यावेत अशी विनंती बागडे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1209095584100966406?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1209093367985926144?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
