Share

नैसर्गिक आपत्तीने उद्ध्वस्त झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या; रासपची मागणी

Published On: 

परभणी : राज्यपालांच्या दौऱ्यावर अनेकदा टीका झाल्या. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नांदेड, हिंगोली आणि परभणी या तीन जिल्हयांचा तीन दिवसाचा दौरा जाहीर केला होता. दि ६ ऑगस्ट रोजी ते परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी राज्यपालांची भेट घेतली आणि निवेदन दिली.

त्यात त्यांनी नैसर्गिक आपत्तीने उद्ध्वस्त झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली. ही माहिती त्यांनी सोशल मीडिया पोस्ट द्वारे दिली. त्यात ते म्हणाले, ‘महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल भगतसिंग कोशारीया हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता, त्यांची भेट घेऊन अतिवृष्टी व मिलीपेड, गोगलगाय इत्यादी नैसर्गिक आपत्तीने उद्ध्वस्त झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली. त्याच बरोबर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत अराजपत्रित गट-ब संवर्गातील पदांच्या जाहिरातीमधील धनगर समाजाच्या (NT-C)प्रवर्गाच्या जागेच्या संदर्भातही राज्यपाल महोदयांना निवेदन दिले.’

दरम्यान, परभणीत पावसाने शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. शेतकऱ्यांच्या हाताचे आलेले पिक दोन वेळा तसेच गेले. परभणी जिल्ह्यात दोन वेळा पाऊसाने नुकसान केले आहे. त्यावर तत्काळ पंचनामे होऊन मदत मिळावी अशी सर्वच शेतकऱ्यांना आशा आहे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!