Share

पुण्यातील उच्चभू सोसायटीत वेश्या व्यवसाय, पोलिसांनी केली थायलंडच्या महिलांची सुटका

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : पुण्यातील उच्चभू सोसायटी समजल्या जाणाऱ्या नांदेड सिटीमध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली चालवल्या जाणाऱ्या वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. नांदेड सिटीमध्ये असणाऱ्या मॉलमध्ये वेश्या व्यवसाय चालवला जात होता, पोलिसांनी कारवाई करत थायलंडच्या पाच महिला आणि व्यवस्थापकाला ताब्यात घेतले आहे.

नांदेड सिटीत असणाऱ्या मॉलमध्ये ऑर्चीड फाईल नावाचे मसाज सेंटर आहे. यामध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने बनावट ग्राहक पाठवत पडताळणी केली असता स्पामध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे आढळले.

स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पद्माकर धनवटे यांच्या नेतृत्वात कारवाई करत पोलिसांनी व्यवस्थापक अक्षय रामेश्वर ससेमल ( रा. नांदेड सिटी) याला अटक केली आहे, तर ससेमलकडून व्यवसाय करून घेणारा कादर शेख ( रा. हडपसर ) फरार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!