🕒 1 min read
मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात फक्त शनिवारी व रविवारी संपूर्ण लॉकडाऊन म्हणजेच वीकेंड लॉकडाऊन करण्यात आला असून सोमवारी रात्री आठ वाजल्यापासून कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत रात्रीची संचारबंदी असेल. तर, दिवसभर जमावबंदी असेल. या निर्णयाला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठींबा दिला आहे.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे व उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांमध्ये आज पुन्हा एकदा टाळेबंदी व उपाययोजनांवर चर्चा झाली आहे. काल ( ५ एप्रिल ) राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी टाळेबंदी, निर्बंध व उपाययोजना ह्या मुद्द्यांवर दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून चर्चा केली. त्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत नेमक्या कोणत्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली याची माहिती दिली आहे.
लॉकडाऊनवर मला काही सूचना करायच्या होत्या, त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांची समक्ष भेट घेणार होतो पण त्यांच्या आसपास अनेक कोरोनाचे रुग्ण असल्यामुळे ते विलगीकरणात आहेत त्यामुळे आम्ही झूमवर संवाद केला, अस राज ठाकरे यांनी सांगितले आहे. मागच्या लॉकडाउनच्या वेळेला जेंव्हा परप्रांतीय कामगार निघून गेले तेंव्हा मी सरकारला सूचना केली होती की हे सगळे परत येतील तेंव्हा त्यांची मोजणी करा आणि कोरोना चाचण्या करा पण हे काही झालं नाही. महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आहेत असं चित्र आहे पण ह्याला काही कारणं आहेत. महाराष्ट्र हे सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेलं राज्य आहे त्यामुळे बाहेरील राज्यातून मोठ्या संख्यने लोकं येतात आणि ते जिथून येतात तिथे कोरोना चाचण्यांचं प्रमाण कमी आहे. अस देखील राज ठाकरे म्हणाले आहेत.
तर, ‘सध्या दहावी-बारावीचे विद्यार्थी कोणत्या मानसिकतेमधून जात असतील याची आपल्याला कल्पनाही नाही. कुठून अभ्यास करणार, कशी परीक्षा देणार, त्याला निकाल कधी लागणार. कसा लागणार याची आपल्याला कल्पनाही नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना सरळ प्रमोट करण्याची मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. इतर विद्यार्थ्यांप्रमाणे या विद्यार्थ्यांनाही प्रमोट करण्यात यावं’. असे राज ठाकरे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- नको असलेला विक्रम! औरंगाबादेतील ‘हे’ तालुके मृत्युदरात राज्याच्याही पुढे
- मुंबईविरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीसाठी आनंदाची बातमी
- ब्रेक द चेन! बीड जिल्ह्यात ३० एप्रिल पर्यंत मिनिलॉकडाऊन
- गंभीर! आरोपीचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांची पोलीस ठाण्यावर दगडफेक
- आमचे हात बांधलेले नाहीत पण खुनाचे उत्तर खुनाने देणे योग्य नाही, राज ठाकरे संतापले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
