Share

संपूर्ण रमजान महिन्याच्या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश जारी

Published On: 

लातूर : साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये लातूर जिल्हयात रमजान महिन्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी संपूर्ण रमजान महिन्याच्या कालावधीत जिल्हादंडाधिकारी जी. श्रीकांत यांनी पुढील प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे.

जिल्हयात कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सद्या सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत ज्याप्रमाणे सामाजिक विलगीकरणाचे पालन करण्याबाबत राज्य शासनाने सूचना दिलेल्या आहेत त्याचे पालन पवित्र रमजान महिन्यामध्ये देखील कटाक्षाने करावयाचे आहे.

कोणत्याही परिस्थितीत मशीदीमध्ये नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफतारसाठी एकत्र येऊ नये. घराच्या/इमारतीच्या छतावर एकत्र येऊन नियमित नमाज पठण, अथवा इफतार करण्यात येऊ नये. मोकळया मैदानावर एकत्र जमून नियमित नमाज पठण इफतार करण्यात येऊ नये.

तसेच कोणताही सामाजिक, धार्मिक किंवा कौटुंबिक कार्यक्रम एकत्रीत येऊन करण्यास मज्जाव करण्यात येत आहे. सर्व मुस्लिम बांधवांनी त्यांच्या घरात नियमित नमाज पठण, तरावीह व इफतार इत्यादी धार्मिक कार्य पार पाडावे.लॉकडाऊन विषयी पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत उपरोक्त सूचनांचे काटेकारपणे पालन करण्यात यावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!