Share

अडचणी वाढल्या : लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये ७० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण

Published On: 

लातूर : लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात शनिवारी एका ७० वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात स्थानिक नागरिकांना बाधा नव्हती, मात्र परराज्यातील आठ यात्रेकरू बाधित निघाले होते. ते सर्वजण कोरोनामुक्त झाल्याने समाधान होते. दरम्यान उदगीरच्या बातमीने चिंता वाढली आहे. उदगीरमध्ये हा पहिलाच रुग्ण आढळला आहे.

दरम्यान राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी तातडीने आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधून इतरांना लागण पसरू नये यासाठी काळजी घ्यावी, असे निर्देश दिले आहेत. सदरील महिला अन्य आजारांनी त्रस्त असल्याने ती रुग्णालयात आली होती. दरम्यान उदगीरवासीयांनी घाबरून जाऊ नये. प्रशासन खबरदारी घेत आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये. लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर महिलेला बाधा कशी झाली, तिचा प्रवास इतिहास आदी तपासून पाहिला जात आहे, तसेच तिच्या संपर्कातील सर्वांना क्वारंटाईन केले जाईल. अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, सदरील महिला गुजरात च्या नागरिकांशी संपर्क असल्याची माहिती मिळते आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!