🕒 1 min read
नवी दिल्ली: भारताच्या पटलावर आणखी एक ऐतिहासिक घटना सद्या घडत आहे. करोडो हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येत प्रभू श्री रामचंद्राचे मंदिर उभारण्यास सुरुवात होणार असून अवघ्या काही तासांवर हा ऐतिहासिक भूमीपूजनाचा कार्यक्रम आला आहे. तर, कोरोना काळात होणाऱ्या या सोहळ्यावरून काँग्रेस सत्ताधारी भाजपावर टीका करताना दिसत होते.
मात्र, आता काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी-वाड्रा यांनी आज एका पत्रकाद्वारे राम मंदिर निर्माणाला समर्थन दिले आहे. या पत्रकात त्या म्हणतात कि, ‘अनेक युगांपासून भगवान श्रीरामाचे चरित्र भारतीय भूमीमध्ये मानवतेला जोडण्याचे काम करत आले आहे. भगवान राम आश्रय आहे आणि त्यागही. राम शबरीचाही आहे आणि सुग्रीवाचाही. राम वाल्मिकींचे आहेत आणि भासांचेसुद्धा आहेत. राम कबिरांचे आहेत आणि तुलसीदासांचेसुद्धा आहेत.’
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आरोग्योत्सव,प्लाझ्मादान शिबीराचे पवारांच्या हस्ते उदघाटन
या पत्रकाच्या शेवटी ‘जय सियाराम’ असा नारा देखील त्यांनी दिला असून हे पत्रक प्रसिद्ध करताना त्यांनी रामाच्या व्यक्तिगुणांचे वर्णन देखील केले आहे. ‘सरळमार्गीपणा, साहस, संयम, त्याग, वचनबद्धता, दीनबंधू हे रामनामाचे सार आहे. राम सर्वांचे आहेत. सर्वांसोबत आहेत. भगवान राम आणि माता सीतेचा संदेश आणि त्यांची कृपा आणि रामलल्लांच्या मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम राष्ट्रीय ऐक्य, बंधुत्व आणि सांस्कृतिक समरतेचा सोहळा बनू द्या,’ असे आवाहन प्रियंका गांधी यांनी ट्विटमधून केले.
आई-बापाने शिक्षणासाठी शेत विकलं, पोराने कलेक्टर होऊन पांग फेडले !
सरलता, साहस, संयम, त्याग, वचनवद्धता, दीनबंधु राम नाम का सार है। राम सबमें हैं, राम सबके साथ हैं।
भगवान राम और माता सीता के संदेश और उनकी कृपा के साथ रामलला के मंदिर के भूमिपूजन का कार्यक्रम राष्ट्रीय एकता, बंधुत्व और सांस्कृतिक समागम का अवसर बने।
मेरा वक्तव्य pic.twitter.com/ZDT1U6gBnb
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) August 4, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्त उद्या (बुधवार) राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाची तयारीही पूर्ण करण्यात आली आहे. सोमवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीदेखील कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी केली. दरम्यान, यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. तर दुसरीकडे करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचनांचं पालनही करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवळपास तीन तास अयोध्या दौऱ्यावर असतील. यामध्ये मंदिराचं दर्शन, पूजा अशा कार्यक्रमांचा समावेश आहे.
नागपूरात कोरोनाच्या संकटातही सत्तासंघर्ष सुरूच;थोरातांच्या बैठकीवर भाजपचा बहिष्कार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
