लातूर : कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे. राज्यात सर्व जिह्यात वेगवेगळ्या रूपाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहे. लातूर येथे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, व्यवसाय प्रशिक्षण संस्था ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी शनिवारी जारी केला.
वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी आज शाळा, महाविद्यालये, खाजगी कोचिंग क्लासेस व प्रशिक्षण देणाऱ्या व्यवसाय संस्था ३१ मार्चपर्यंत बंद ठेवाव्यात, असा आदेश जारी केला आहे. या कालावधीत ऑनलाईन या पर्यायाचा वापर करुन शिकवणी वर्ग आयोजित करावेत. विद्यापीठाने निर्धारित केलेल्या पूर्वनियोजित वार्षिक व सहामाही महाविद्यालयीन स्तरावरील परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा, शासनाने घालून दिलेल्या कोविड-१९ सुरक्षा नियमांचे पालन करुन घेता येतील.
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मास्कच्या वापरासह शारीरिक अंतर पाळण्याच्या सूचना देऊन स्थानिक प्रशासनामार्फत दंडात्मक कार्यवाही केली जात आहेत. तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरुन रात्रीची संचारबंदी पाळून सर्व राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे, तर पूर्वनियोजित विवाह समारंभास केवळ ५० व्यक्तींनाच उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- परमबीर सिंह यांनी आरोप सिद्ध करावेत, मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार – अनिल देशमुख
- हे तर अधिकाऱ्यांना दबावात आणून भाजपने केलेलं षडयंत्र : सचिन सावंत
- १०० कोटी वसुली प्रकरणात उद्धव ठाकरेंचासुद्धा सहभाग : नारायण राणे
- पंधरा केंद्रांवर तीन हजार 912 परीक्षार्थी एमपीएससीची परीक्षा देणार
- १०० कोटी वसुली प्रकरणात उद्धव ठाकरेंचासुद्धा सहभाग : नारायण राणे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

