औरंगाबाद : देशात कोरोनाचे संकट घोंगावत असताना याचे संक्रमण रोखण्यासाठी हर्सुल येथील कारागृहात विविध गुन्ह्यात सजा झालेले बंदींनी मास्क बनवण्यासाठी पुढे आले आहे. कारागृह प्रशासनाच्या प्रयत्नाने मास्क बणवण्यासाठी कारागृहात कारखाना सुरु करण्यात आला आहे.
प्लास्टिक बंदी झाली होती त्यावेळेस कैद्यांनी कापडाच्या पिशव्या बणवून याची मोठ्या प्रमाणात कारागृह प्रशासनाने विक्री केली होती. यावेळी कापडाचे मास्क बनवून नागरिकांच्या आरोग्यासाठी चांगला प्रयत्न केले जात आहे. औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहात मास्क बनविले जात आहे.
कारागृहातील बंदी ,कर्मचारी अधिकारी यांना वाटप केले, तसेच पोलिस आयुक्तालय औरंगाबाद, महावितरण कार्यालय, जालना कारागृह, उस्मानाबाद कारागृह येथेही सप्लाय करण्यात आले असून, मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू आहे, रात्री सुध्दा कारखाना सुरू आहे.
औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहातील कारखाना विभागातून उच्च न्यायालयात २३७ नग मास्क तयार करून दिले, तसेच ५०९ नग मास्क स्टेट बॅक यानाही दिले, पोलिस आयुक्त कार्यालय यांना १२५० नग मास्कचा पुरवठा करण्यात आला आहे. अशी माहिती डि-24 न्यूजला कारागृह प्रशासनाने दिली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

