टीम महाराष्ट्र देशा – पुलवामा येथे गुरुवारी दहशतवाद्यांकडून सीआरपीएफच्या जवानांवर भ्याड हल्ला करण्यात आला. या हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. तर देशाच्या पंतप्रधान नरेंद मोदींनी झासी येथे एका जाहीर सभेत पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला जाणार, आहे अशा कठोर शब्दात पाकिस्तानला इशारा दिला आहे तसेच ”भारतीय लष्कराला प्रत्युत्तराच्या कारवाईसाठी योग्य ते स्थान आणि वेळ निवडण्यासाठी संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. असे त्यांनी यावेळी प्रतिपादन केले. तर पाकिस्तान हा देश जगभरात भिकेचा कटोरा घेऊन फिरत आहे अशी निंदा देखील मोदींनी यावेळी केली.
नरेंद्र मोदी सभेला संबोधित करताना पुढे म्हणाले की, ”कोणत्या वेळी, कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या स्वरुपात या दुश्मनांना प्रत्युत्तर देयचे, याचे संपूर्ण स्वातंत्र्य सैन्य दलाला देण्यात आले आहे. शेजारील देशांना या भ्याड हल्ल्याचे सडेतोड उत्तर देशातील १३० कोटी जनतेकडून मिळेल”, असा इशारा देखील पंतप्रधान मोदींनी यावेळी दिला.
देशाच्या सैनिकांनी आपले कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती दिली आहे . त्यांचे हे बलिदान व्यर्थ जाणार नाही अशी नरेंद्र मोदींनी देशाला ग्वाही दिली.
दरम्यान गुरुवारी दुपारी ३:२५ वाजता जैश – ए – मोहम्मद या दहशतवादी संघटनेने जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला. तब्ब्ल २०० किलो वजनाच्या स्फोटकांनी भरलेली चार चाकी सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर धडकावली. यामध्ये ४२ जवान शाहिद झाले असून २० जवान जखमी झाले. गेल्या दोन दशकातला हा सर्वात मोठा हल्ला होता.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

