चंदीगड: करोना काळात मंदावलेला वाहन उद्योग गतीमान होत आहे. ग्राहकांकडून देखील वाहन खरेदीला प्रतीसाद दिला जात आहे. मात्र आत नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच वाहने महाग होणार असल्याच सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे आणखी एका वेगळ्या कारण मुळे आगामी काळात सीएनजी आणि एलपीजी गाड्यांच्या किंमती वाढणार आहेत.
पंजाबच्या मंत्रिमंडळाने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यानुसार गाड्यांच्या नव्या मॉडेल्सच्या नोंदणीसाठी प्रोसेसिंग फी आकारण्यात येणार आहे. तर सीएनजी आणि एलपीजी वाहनांच्या किटला मंजुरी देण्यासाठी व नोंदणीवरही प्रोसेसिंग फी आकारली जाईल
प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. आता सरकारनेही इलेक्ट्रिक कारच्या विक्रीला चालना देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे लोक इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याचा अधिक विचार करत आहेत.
यासाठी दिल्लीतील पेट्रोल पंप आणि सीएनजी स्टेशनप्रमाणे रस्त्याच्या शेजारीच चार्जिंग स्टेशन भारण्यात येणार आहेत. यासाठी कार पार्क करण्यासाठी पुरेशी जागा, तसेच कार चार्ज करण्यास कुठलाही अडथळा येणार नाही, अशा जागा निवडण्यात येणार आहे. गाडी चार्ज करण्यास उत्तम अशा दिल्लीतील बऱ्याच जागा एमसीडीने आतापर्यंत निश्चित केल्या असल्याचे बोलले जात आहे. यात दक्षिण एमसीडीने 75, उत्तर 127, पूर्व 93 स्थानांना आपली पसंती दर्शवली आहे.
मात्र आता पंजाबमध्ये सीएनजी, एलपीजी आणि इलेक्ट्रिक वाहन खरेदी केल्यास वाहन नोंदणीवेळी पैसे भरावे लागतील. शेजारच्या राज्यांमध्ये वाहनांच्या नोंदणीवर आकारण्यात येणाऱ्या प्रोसेसिंग फीच्या निर्णयाचे पंजाब सरकारकडून अनुकरण करण्यात आले आहे.
पंजाब सरकारने 1989 च्या मोटर कायद्यात कलम 130 ए चा समावेश केला आहे. त्यानुसार आता वाहननिर्मिती करणाऱ्या कंपन्या किंवा अधिकृत डिलर्सकडून सीएनजी आणि एलपीजी वाहनांच्या किटला मंजुरी देताना आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीवेळी सरकार 5000 रुपयांची प्रोसेसिंग आकारेल.
तसेच नव्या वाहनांच्या नोंदणीचे अधिकार परिवहन विभागाच्या बिगरव्यावसायिक विभागाला देण्यात आले आहेत. या मंजुरीसाठी वाहननिर्मिती करणाऱ्या कंपन्या आणि डिलर्सना अधिकृत टेस्टिंग एजन्सीकडे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ऊर्जा विभागाच्या वीज कंपन्यांमध्ये प्रकल्पग्रस्तांना त्वरित सामावून घेण्याच्या प्रक्रियेस गती द्या – नितीन राऊत
- काँग्रेस पक्षाच्या जवळ सर्व प्रकारची माणसे आहेत. मात्र युवकांची कमतरता – धिरज देशमुख
- ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्रात होणार देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ !
- पर्यटन विकासाला चालना देण्यासाठीच बीच शॅक धोरणाला मंजुरी – आदित्य ठाकरे
- विकासप्रकल्प पूर्ण करताना कालबद्ध मर्यादेत पूर्ण करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

