Share

“केतकीसारख्या विकृतीला वेळीच आवर घाला,” ; राज ठाकरे संतापले

Published On: 

मुंबई : अभिनेत्री केतकी चितळे हीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या अत्यंत विकृत पोस्टवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे फार संतापले आहेत. राज ठाकरे यांनी एक पत्र जाहीर करून केतकीचे कान उपटले आहेत. केतकी चितळेने जे शरद पवार यांच्याबद्दल पोस्ट केली आहे, ती भाषा, त्या लिखाणाला महाराष्ट्राच्या संस्कृतीत जागा नाही. याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, असे राज ठाकरे आपल्या पत्रात म्हणत आहेत.

केतकी चितळे हिची पोस्ट, त्यासारखं लिखाण म्हणजे प्रवृत्ती नसून मानसिक विकृती आहेवेळीच त्याला वेळीच आवर घालायला पाहिजे. कोणीही महाराष्ट्रसारख्या राज्याची परंपरा खली नेऊ नये, अशी अपेक्षाही राज ठाकरे यांनी व्यक्त केली. अशा विकृत टोळक्यामुळे समाजा – समाजामध्ये तेढ निर्माण होते. समाज दुभंगला जातो. हे सगळं महाराष्ट्रात वेळीच आवरणं गरजेचं आहे. कारण आपल्या महाराष्ट्राची ओळख वेगळी आहे. राज्य सरकारने याचा छडा लावून बंदोबस्त करावा, असेही राज ठाकरे आपल्या पत्रात म्हणत आहेत.

काय म्हणाली होती केतकी चितळे –

तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll

ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक

सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll

मर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll

ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll

भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll

खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll

याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll

-Advocate Nitin Bhave

भावे यांचे असे विकृत लिखाण केतकी चितळे हिने फेसबूक पोस्ट केली होती.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!