नाशिक : राज्यात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन घोषित केला आहे. मात्र या काळात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सरकारी अधिकारी असल्याचं सांगून कोरोनाच्या सर्वेक्षणासाठी आल्याचं भासवत भामट्यांनी एका महिलेचे सोन्याचे दागिने लांबवल्याची घटना नाशिकमध्ये समोर आली आहे.
‘जुलै अखेरपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ द्या’
मिळालेल्या माहितीनुसार,शारदा कनोजिया या 48 वर्षीय महिला नाणेगाव रोड परिसरात लॉन्ड्रीचे दुकान चालवतात, शनिवारी दुपारी दोन इसम त्यांच्या दुकानात आले आणि त्यांनी आम्ही देवळाली कँटोनमेन्ट बोर्डाकडून आल्याचं सांगत मास्क वापरा, सॅनेटायझर लावा असे सांगत बोलण्याच्या नादात गुंतवत कनोजिया यांना त्यांच्या गळ्यातील 40 हजार रुपयांची सोन्याची पोत काढून देण्यास सांगितली आणि काही क्षणातच ते फरार झाले.
चीनने गुडघे टेकले, गलवान खोऱ्यातून चिनी सैन्य दीड किलोमीटर मागे हटलं
विशेष म्हणजे सॅनेटायझरच्या नावाखाली त्यांनी काहीतरी गुंगीचे औषध देखील फवारल्याचा महिलेला संशय आहे. नाशिकमधील देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे अनेक मंडळी कोड्यात पडल्याचं दिसून येत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजविली असून गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.


