Share

चंद्रकांत पाटील म्हणतात आता ‘रात गयी, बात गयी’…

Published On: 

पुणे : भाजपमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असलेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावरून आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यात शाब्दिक युद्धाला सुरवात झाली आहे. एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीकडून कॅडबरी मिळते की लिमलेटची गोळी तेच बघायचं आहे असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. त्याला उत्तर देताना एकनाथ खडसे म्हणाले होते की, “चंद्रकांतदादा तुमचा भाजपाशी संबंध काय? तुम्ही तर कुल्फी आणि चॉकलेट मिळावं म्हणून भाजपामध्ये आलात”. दरम्यान त्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून आपल्यासाठी विषय संपल्याचं सांगितलं आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने अटल बस सेवेचा शुभारंभ भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी चंद्रकांत पाटील यांना कुल्फी किंवा चॉकलेट मिळावं म्हणून तुम्ही भाजपात आलात. तसंच माझ्या मागे ईडी लावली तर मी सीडी लावेन असं विधान एकनाथ खडसे यांनी केल्यासंबंधी विचारलं असता ‘रात गयी, बात गयी’ म्हणत त्यांनी उत्तर देणं टाळलं.

दरम्यान, एकनाथ खडसे दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीत प्रवेश घेणार होते त्या प्रवेशाला चार वाजले. राष्ट्रवादीचं खडसेंना काय द्यायचं ते ठरलेलं नाही. तुमचं समाधान होईल असं देऊ या शब्दावर नाथाभाऊ बळेबळे नरीमन पॉईंटच्या घरातून बाहेर पडले. आता तुमचं समाधान होईल…यामध्ये लिमलेटच्या गोळीनेही समाधान होतं आणि कॅडबरीनेही. त्यामुळे राष्ट्रवादी आता खडसेंना लिमलेटची गोळी देणार की कॅडबरी ते बघावं लागेल,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!