🕒 1 min read
नवी दिल्ली : ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालय व सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यावर वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी दोषी असल्याचा निकाल दिला आहे. प्रशांत भूषण यांना १ रुपयाचा दंड सुनावण्यात आला आहे. त्यांनी जर हा दंड १५ सप्टेंबर पर्यंत भरला नाही तर मात्र त्यांना शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे.
प्रशांत भूषण यांना अवघा १ रुपयाचा दंड भरण्यास सांगितले असून जर त्यांनी तसे केले नाही तर तीन महिने कारावास वा वकिली करण्यावर ३ वर्षांच्या बंदीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रशांत भूषण यांनी माफी मागावी यासाठी दबाव आणला जात होता मात्र, माफी न मागण्यांवर ठाम असल्याची भूमिका त्यांनी कोर्टात मांडली होती.
परिक्षांच ठरलं? कुलगुरूंनी केली ‘या’ मुदतीची मागणी
यानंतर हे प्रकरण मिटवण्यावरून देशभरात चर्चा व राजकीय टिकांचे सत्र सुरु झाले होते. माफी न मागण्यावर ठाम असलेले प्रशांत भूषण हे १ रुपयाचा दंड भरणार का यावर सर्वांच लक्ष लागले आहे. जर त्यांनी हा दंड भरला तर त्यांनी केलेल्या वक्तव्य हे गुन्हा असल्याचे मान्य केल्यासारखे होईल असे म्हणले जात आहे. त्यामुळे येत्या काळात भूषण काय करतात हे महत्वाचं ठरणार आहे.
…तर आशिष शेलार यांना असले ‘टुकार’ स्टेटमेंट द्यायची वेळ येणार नाही – रुपाली चाकणकर
दरम्यान, प्रशांत भूषण यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ठोठावलेला दंड भरण्यास तयार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. तर, अजूनही मी माझ्या वक्तव्यावर ठाम असल्याची भूमिका त्यांनी अजूनही कायम ठेवली असून न्यायिक प्रक्रियेअंतर्गत ठोठावलेल्या दंडाचा आदर असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. तसेच, पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा विचार असल्याचे देखील ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी सांगितले आहे.
दारूची दुकाने उघडण्यास परवानगी मग धार्मिक स्थळांना का नाही ? – बबनराव पाचपुते
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

