अहमदनगर/ऋषीकेश घोगरे : राज्य सरकारला दारूची दुकाने सुरु करण्याची घाई झाली होती पण धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी का दिली जात नाही. संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात मद्य मुबलक प्रमाणात मिळत आहे. मात्र भजन पूजन करणाऱ्या भाविक भक्तांवर गुन्हे दाखल होत आहेत. अशी टीका श्रीगोंद्याचे भारतीय जनता पार्टीचे आमदार बबनराव पाचपुते यांनी राज्य सरकारवर केली आहे.
आमदार पाचपुते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील देवस्थाने, धार्मिकस्थळे खुली करण्याची मागणी सातत्याने होत आहे. केंद्र सरकारनेही ४ जून २०२० रोजी नियमावलीसह परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार देशभरातील बहुसंख्य प्रमुख देवस्थाने सुरु झालेली आहेत. राज्यातही सामाजिक अंतर पाळून आवश्यक नियम, अटींसह देवस्थाने, धार्मिक स्थळे सुरु व्हावीत. भजन, कीर्तन व पूजनास परवानगी मिळावी. अशी मागणी पाचपुते यांनी केली आहे.
…तर आशिष शेलार यांना असले ‘टुकार’ स्टेटमेंट द्यायची वेळ येणार नाही – रुपाली चाकणकर
भाविक भक्तांना जेल, गुन्हेगारांना बेल असा महाविकास आघाडी सरकारचा कारभार सुरु आहे. राज्यातील धार्मिक स्थळे बंद असल्याने तेथील स्थानिक अर्थकारण ठप्प झाले असून व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर देवस्थाने सुरू करावीत अशी मागणी पाचपुतेंनी केली आहे. श्रीगोंदा येथे ते माध्यमांशी बोलत होते.
गतवर्षी खड्डयांसोबत सेल्फी काढणारी राष्ट्रवादी यावर्षी हा ‘स्तुत्य उपक्रम’ का राबवत नाही?


