Share

Prakash Ambedkar : एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार अडचणीत ? प्रकाश आंबेडकरांचा मोठा खुलासा

Published On: 

मुंबई : विधानपरिषदेच्या निकालानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकासाआघाडी सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह येत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे संकेत दिले आहेत. तर आज सकाळी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावे आणि मगच सरकार स्थापन होईल अशी अट भाजपने एकनाथ शिंदेंना घातली आहे? असं ट्विट प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. प्रकाश आंबेडकरांच्या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना वेगळं वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंबेडकरांच्या या ट्विटनंतर आता भाजपकडून काय प्रतिक्रिया येतेय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, ज्यांना मी नको आहे, त्यांनी तसे येऊन सांगावे किंवा फोनवर बोलावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना केले आहे. कोणाकडे किती संख्या आहे हा विषय आपल्यासाठी गौण आहे. पण ती संख्या तुम्ही कशी जमवता, यालाही महत्त्व आहे. माझ्याविरोधात अविश्वास ठराव येण्याची वेळ येऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या : 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!