Share

Gulabrao Patil- आमदार गुलाबराव पाटील गुवाहाटीला पोहोचले

Published On: 

मुंबई : विधान परिषदेच्या निकालानंतर मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाने शिवसेनेत मोठी खळबळ माजली आहे. मात्र एकनाथ शिंदे यांना ४६ आमदारांचा पाठिंबा असल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर आता महाविकास आघाडी सरकारच काय होणार हा मोठा प्रश्न समोर उपस्थित झाला आहे.

दरम्यान, आता शिवसेनेच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिवसेनेचा फायरब्रँड नेता गुलाबराव पाटील हे गुवाहाटीला पोहोचले आहेत.  एकनाथ शिंदे यांच्या गटात आणखी एक कॅबिनेट मंत्री सामील झाला आहे. भाजपसोबत जाण्याचा मुख्यमंत्र्यांना पाटील यांनी सल्ला दिला होता मात्र उद्धव ठाकरे यांनी निर्णय न घेतल्याने पाटील हे शिंदे गटात सामील झाले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थोड्या वेळापूर्वी लाईव्ह येत आपल्या मुख्यमंत्रीपदाबाबत खुलासा केला आहे. मला कोणताही मोह नाही, मी राजीनामा द्यायाल तयार आहे. परंतु, ज्यांना मी नकोय त्यांनी माझ्या समोर येऊन बोला. समोर येऊन बोललात तर संध्याकाळी देखील राजीनामा देतो, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच मी मुख्यमंत्री पद आणि पक्षप्रमुखपद देखील सोडायला तयार आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर मला आनंद आहे. पण समोर येऊन सांगा… मी आव्हानांना तोंड देणारा माणूस आहे, असं ते लाईव्हमध्ये बोलताना म्हणाले.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!