Share

‘कोणी विचारलं तर प्रमाणपत्र दाखवता येतं म्हणून मी स्वतः कोविडची टेस्ट करुन घेतली’

Published On: 

अकोला : मी उत्सुकतेपोटी कोरोना टेस्ट केली आहे. कोणी विचारलं तर प्रमाणपत्र दाखवता येतं, अशी मिश्कील टिपण्णी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते अकोल्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

‘मी स्वतः कोविडची टेस्ट करुन घेतली आहे. राज्य सरकारने आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य आणि सर्व लोक प्रतिनिधींची कोविड टेस्ट करुन घ्यावी. ज्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे, त्यांना शासनाने क्वारंटाईन करावं. मात्र, ज्यांची कोविड टेस्ट निगेटिव्ह आली आहे त्यांना फिरायला रानमोकळ करावं,’ असंही ते म्हणाले.

दरम्यान, राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू लॉकडाऊनच्या मुदतवाढीला जोरदार विरोध देखील त्यांनी केला आहे. सरकारने 31 जुलैनंतर पुन्हा लॉकडाऊन वाढवल्यास रस्त्यावर येऊन विरोध करु, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिली. यावेळी त्यांनी गुन्हे दाखल होण्याची भीती दाखवू नका, माझी जेलमध्ये जाऊन राहण्याची तयारी असल्याचंही आंबेडकर यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

ऐश्वर्या व आराध्या बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह; मायलेकींना रुग्णालयातून डिस्चार्ज

आघाडी सरकारचे अपयश आक्रमकतेने मांडा; चंद्रकांत पाटलांचे पदाधिकाऱ्यांना आवाहन 

शेतकऱ्यांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करा, बँकांना सक्त आदेश

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!