Share

‘प्रकाश आंबेडकरांना नको तिथे नाक खुपसून प्रसिद्धीत राहण्याची घाण सवय’, काँग्रेस पदाधिकाऱ्याचा हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरुन आता राजकारण रंगत आहे. दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावासाठी प्रकल्पग्रस्त आग्रही आहेत. तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी शिवसेना नेते आक्रमक झाले आहेत. या वादात आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ज्ञानी उडी घेतली असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावं अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

यावर पनवेल तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अभिजीत पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केलीय. ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा थेट वंशज ही गोष्ट वगळता प्रकाश आंबेडकर या माणसाची काही एक पात्रता नाही. अजिबात स्वकर्तृत्व नसलेला हा तथाकथित नेता आयुष्यभर कुणाच्यातरी कुबड्यांवर राजकारणात उभा राहिला,’ असा आरोप अभिजीत पाटील यांनी केलाय.

याविषयीची त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात ते म्हणतात की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा थेट वंशज ही गोष्ट वगळता प्रकाश आंबेडकर या माणसाची काहीएक पात्रता नाही. अजिबात स्वकर्तृत्व नसलेला हा तथाकथित नेता आयुष्यभर कुणाच्यातरी कुबड्यांबर राजकारणात उभा राहिला आणि नंतर खाल्ल्या पानात थुंकून दुसऱ्याच्या वळचणीला गेला. राजकारणातला त्यांचा वावर हा सुपारी घेतल्यासारखाच आहे ही एक बाब आहे. आपला काही संबंध नाही अशा गोष्टीत नाक खुपसून प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची त्यांची हौस ही दुसरी घाण सवय त्यांना आहे.

खूप दिवसांत पेपरात नाव आलं नाही म्हणून..
नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यायचं की दि. बा. पाटील यांचं, याच्याशी वास्तविक प्रकाशजींच्या वंचित बहुजन आघाडीचा सुतराम संबंध नाही. नवी मुंबईत त्यांना किंवा त्यांच्या पक्षाला काडीचं स्थान नाही. इथल्या लोकभावना, इथल्या अस्मिता, इथले आर्थिक प्रश्न, याबाबत प्रकाशजींनी चार परिच्छेदांचा निबंध कुणाशी चर्चा न करता लिहून दाखवला तर मी त्यांचा दास होईन. दि. बा. पाटील यांच्याबद्दलही त्यांना काही माहिती असेल अथवा आस्था असेल अशातलाही भाग नाही. पण खूप दिवसांत पेपरात नाव आलं नाही आणि महाविकास आघाडी सरकारला विरोध करणं हा सध्या एकमेव व्यवसाय असल्यामुळे त्यांनी बाळासाहेब ठाकरे नावाला विरोध करत ‘संघ’प्रणित भाजपाच्या हातात हात मिळवलाय.

संविधानापेक्षा वैयक्तिक रागलोभ प्रकाश आंबेडकरांना महत्त्वाचे
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आपल्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे करून आंबेडकरांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पाडून भाजपाला अशीच अप्रत्यक्ष मदत केली होती. चार वर्षांपूर्वी तमाम विरोधी पक्षांनी मुंबईत "संविधान बचाव" मोर्चा काढला तेव्हा हे घटनाकारांचे वारस कसला तरी फडतुस प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण करुन त्यापासून दूर राहिले होते. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानापेक्षा आपले वैयक्तिक रागलोभ प्रकाश आंबेडकरांना जास्त महत्त्वाचे वाटले होते.

या दोघांच्या नखाचीही सर प्रकाशजींना नाही
वास्तविक, बाळासाहेब ठाकरे आणि दि. बा. पाटील आपापल्या जागी श्रेष्ठ आहेत. नव्या मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी दिबांनी आपली हयात घालवली. राजकीय पदांची कधी पर्वा केली नाही. प्रकाशजींनी दिबांच्या संघर्षात कधी वाटा उचलल्याचं माझ्या तरी ऐकिवात नाही. तिथे झपाट्याने कॉस्मॉपॉलिटन होत असलेल्या मुंबईत बाळासाहेबांनी मराठी अस्मिता धगधगत ठेवली. गरीब घरात जन्मलेले, गल्लीबोळात वाढलेले असंख्य बहुजन तरुण त्यांनी राजकारण आणले आणि एक अख्खी पिढी घडवली. शाहू, फुले, आंबेडकरांनंतर एक आगळं सोशल इंजिनिअरिंग कुणी केलं असेल तर ते बाळासाहेब ठाकरे यांनी. या दोघांचीही महती इतकी मोठी आहे की विमानतळाला नाव दिल्याने किंवा न दिल्याने, ती वाढणार नाही की कमी होणार नाही. या दोघांच्या नखाचीही सर प्रकाशजींना नाही.

प्रकाश आंबेडकर आगीत तेल ओतायला आले
विमानतळाला कुणाचं नाव द्यायचं यावरुन मतभेद निर्माण झालेले दिसले, तिथे तापल्या तव्यावर आपली पोळी भाजायला हे पुढे आलेत. दोन्ही बाजूच्या लोकांनी शांततामय मार्गाने यावर तोडगा काढावा अशी अपेक्षा आहे. पण आगीत तेल ओतायला आलेल्या प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांना मात्र थारा देऊ नये. नवी मुंबईत प्रकल्पग्रस्त आणि बाहेरून आलेले लोक यांच्यात आता कुठे सुसंवाद प्रस्थापित होतोय. विघ्नसंतोषी लोकांमुळे तो बिघडता कामा नये. ‘नावात काय आहे?’, असं शेक्सपिअर म्हणून गेला. पण हे बाळासाहेब आणि ते बाळासाहेब यात अमाप फरक आहे. ते बाळासाहेब झकास पाईप ओढायचे. सुपारी खायचे नाहीत, असे म्हणत अभिजीत पाटील यांनी टीकास्त्र सोडले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!