Share

सरावाला परवानगी मिळाली मात्र क्रीडास्पर्धांना करावी लागणार आणखी प्रतीक्षा !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :नुकतच आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्र 2020 च्या विधेयकास विधिमंडळात एकमताने मंजुरी देण्यात आली. विधेयक विधिमंडळाच्या अधिवेशनात सादर करण्यात आले.  क्रीडाविषयक कामगिरी आणखी उंचावणे, क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध असलेली विविध क्षेत्रे विचारात घेऊन क्रीडा क्षेत्रात नोकरीच्या, प्रशिक्षणाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात व तरुण वर्गास क्रीडा क्षेत्रात येण्यास प्रोत्साहन मिळावे, या अनुषंगाने राज्यात जास्तीत जास्त दर्जेदार कोच/प्रशिक्षक तसेच, खेळाडू निर्माण व्हावेत, हा आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापनेचा उद्देश असल्याच क्रीडामंत्री सुनिल केदार यांनी सांगितलं.

राज्यात सध्या शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे येथील बालेवाडी येथे आहे. या क्रीडा संकुलात विविध खेळांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध आहेत. या सुविधांचे अद्ययावतीकरण तसेच नवीन सुविधा उपलब्ध करण्याची कार्यवाही सातत्याने होत असते. या पार्श्वभूमीवर हे विद्यापीठ सध्या शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे कार्यान्वित करण्यात येणार आहे.

राज्यातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील भागांमध्ये प्रमाणित कार्यपद्धतीनुसार क्रिकेट, कबड्डी, कुस्ती, बॅडमिंटन, अ;ॅथलेटिक्स आणि जलतरण या क्रीडा प्रकारांच्या सरावाला परवानगी देण्यात आली आहे. मात्र क्रीडा स्पर्धा, कार्यशाळा अथवा प्रशिक्षण शिबिरांचे पुढील आदेशापर्यंत आयोजन करू नये, असे स्पष्ट संकेत राज्य शासनाने दिले आहेत.

प्रत्यक्ष संपर्क नसलेल्या जलतरण, तिरंदाजी, सायकलिंग, तलवारबाजी, नेमबाजी, अ;ॅथलेटिक्स तसेच मध्यम संपर्क असलेल्या फुटबॉल, हॉकी, क्रिकेट, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, हँडबॉल, वेटलिफ्टिंग, लॉन टेनिस, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ, खो-खो आणि प्रत्यक्ष संपर्क असलेल्या कुस्ती, ज्युडो, वुशू, तायक्वांदो, कराटे, बॉक्सिंग, वॉटरपोलो, कबड्डी या खेळांच्या सरावाला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. मुंबई क्रिकेट संघटना आणि महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेने सादर केलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीलाही शासनाने मान्यता दिली आहे.

२०२८च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसह आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये राज्यातील क्रीडापटूंनी पदके जिंकावीत, या उद्देशाने बालेवाडी (पुणे) येथे आंतरराष्ट्ऱीय क्रीडा विद्यापीठ सुरू करत आहोत. पुढील शैक्षणिक वर्षांपासून येथे क्रीडा शास्त्र, क्रीडा तंत्रज्ञान आणि क्रीडा प्रशिक्षण हे तीन अभ्यास सुरू करण्यात येणार आहेत, अशी घोषणा राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!