Share

सकारात्मक : मधुमेह व उच्च रक्तदाबग्रस्त ५६ वर्षीय महिला कोरोनामुक्त !

Published On: 

पुणे : कोरोनाने देशभरात हाहाकार माजवला आहे. संपूर्ण जगभरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. भारतात देखील तीन मेपर्यंत लॉकडाऊन आहे. एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे पुण्यातून एक चांगली बातमी समोर येत आहे. वृद्ध आणि आजाराचा इतिहास असणाऱ्या रुग्णांना कोरोना जास्त बाधित करतो असं म्हटलं जातं. मात्र आपल्या जिद्दीने आणि शारीरिक ताकतीने एका 56 वर्षीय महिलेने कोरोनावर मात केली आहे.

पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल झालेला पहिल्या कोरोनाग्रस्त रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. ८ एप्रिल रोजी त्यांना उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. जेव्हा त्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या तेव्हा त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण व रक्तदाब नियंत्रणाबाहेर चालले होते. ही परिस्थिती आव्हानात्मक होती, कारण त्यांना इतर दीर्घकालीन आजारी होत्या. यावर मात करत त्यांच्यावर यशस्वी उपचार झाले. उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर्स आणि टीमचे पुणेकरांच्या वतीने महापौर मुरलीधर मोहळ यांनी आभार मानले आहेत.

दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवड मध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी टाळेबंदीचे निर्बंध कडकपणे राबवावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे येथे दिले. पुण्यातील कौन्सिल हॉल येथे पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली, यावेळी त्यांनी हे निर्देश दिले आहेत.

पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या व मृत्यू दर कमी करणे आवश्यक आहे. या भागात गर्दी होऊ नये, यासाठी येथील शॉपिंग मॉल कोणत्याही परिस्थितीत सुरु करण्यात येऊ नयेत, असे निर्देश त्यांनी दिले. पवार म्हणाले, कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक ती मदत तात्काळ उपलब्ध करुन देण्यात येईल. कंटेंटमेंट भागात लॉक डाऊनचे धोरण पोलीस प्रशासनाने कडक अवलंबून कोणत्याही परिस्थितीत कोरोनाची साखळी तोडणे आवश्यक आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!