मुंबई- गेल्या दोन महिन्यांत अनेक कलाकारांनी जगाचा निरोप घेतला आहे. आता चाहत्यांसाठी आणखी एक दु:खद बातमी आहे. टीव्ही अभिनेते जागेश मुकाती यांनी काल 10 जूनला अखेरचा श्वास घेतला. ‘अमिता का अमित’ आणि ‘श्री गणेश’ या टीव्ही मालिकांसोबत अनेक चित्रपटांतही जागेश यांनी काम केले आहे.
Jagesh Mukati paased away!! we lost a very talented actor…GOD BLESS HIS SOUL????#jageshmukati #Gujaratiactor pic.twitter.com/2JCLntawi9
— Gujarati Films.com (@gujratifilmscom) June 10, 2020
जगेश यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांच्यावर 4 दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी त्यांची प्रकृती खालवली आणि त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला. बुधवारी दुपारी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अकाली निधनानं कला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
जगेश मुकाटी यांनी अनेक हिंदी आणि गुजराती मालिकांमध्ये काम केलं. ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेतही काम करून त्यांनी प्रेक्षकांची मन जिंकली. ‘अमिता का अमित’, ‘श्रीगणेश’ यांसारख्या मालिका आणि ‘हसी तो फसी’, ‘मन’ या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारली होती.
मोठी बातमी : महाविकास आघाडीत बिनसलं ? कॉंग्रेसच्या मंत्र्यांची तातडीची बैठक…
नरेंद्र मोदींनी आमच्याबाबतही प्रेमाचा दृष्टीकोन ठेवावा – शरद पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

