रायगड : मागील आठवड्यात आलेल्या निसर्ग’ चक्रीवादळाने कोकणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.शेती,फळबागा,घरांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दोन दिवस कोकण दौऱ्यावर आहेत. या महत्वाच्या दौऱ्यामध्ये पवार शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत आहे.
शरद पवार यांच्याबद्दल माझ्या मनात जितेंद्र आव्हाडांपेक्षा जास्त आदर – चंद्रकांत पाटील
शरद पवार यांनी नुकासानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यामध्ये अम्फान चक्रीवादळात झालेल्या नुकसानासाठी पश्चिम बंगालला केंद्रानं पॅकेज दिलं ते चांगलंच झालं. त्या ठिकाणी १८ जिल्ह्यांचं नुकसान झालं आहे. आमचे म्हणणे इतकेच आहे की आम्ही जेव्हा मदतीच्या मागणीसाठी येऊ तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमच्याबाबतही तसाच प्रेमाचा दृष्टीकोन ठेवावा, अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
अम्फान चक्रीवादळात झालेल्या नुकसानासाठी प. बंगालला केंद्राने जे पॅकेज दिलं त्याबद्दल दुमत नाही. त्याठिकाणी १८ जिल्ह्यांचे नुकसान झाले आहे.आमचे म्हणणे इतकेच आहे की आम्ही जेव्हा मदतीच्या मागणीसाठी येऊ तेव्हा पंतप्रधान @narendramodi यांनी आमच्याबाबतही तसाच प्रेमाचा दृष्टीकोन ठेवावा. pic.twitter.com/p9zqklSCR9
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 9, 2020
हे महाराष्ट्रावरचे संकट आहे. यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन यावर मात करण्याची गरज आहे. आता केंद्र आणि राज्य सरकारची जबाबदारी पाहण्याची वेळ नाही. एकत्र येऊन संकटावर मात करण्याची ही वेळ आहे, असं शरद पवरांनी सांगितले. निसर्ग चक्रीवादळाने कोकणात झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी केंद्र सरकारकडे राज्य सरकारमार्फत योग्य ती मांडणी करावी लागेल, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.


