🕒 1 min read
मुंबई : सध्या महाराष्ट्रातील कोरोनाने थैमान घातले आहे. राज्यातएकूण कोरोना रुग्णांचा आकडा 90 हजाराहून अधिक झाला आहे. राज्य सरकार आणि प्रशासनाच्या कामावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. चीनमध्ये एकूण 83,040 कोरोनाग्रस्तरुग्णांची नोंद झाली आहे. परंतु फक्त महाराष्ट्र राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडासंपूर्ण चीन देशातील कोरोना रुग्णांपेक्षा जास्त झाल्याचे चित्र आहे.
‘राज्यात कोरोनामुळे मृत्यू कमी झाले आहेत याचं फडणवीस-दरेकरांना वाईट वाटत आहे’
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात कमी पडतअसल्याची जनभावना वाढू लागली आहे. एकाबाजूला ही परिस्थिती असताना मुंबईत मात्र ठिकठिकाणी कोरोना परिस्थिती हाताळणाऱ्यामुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर कौतुकाचा वर्षाव करणारे होर्डिंग लागल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत ठिकठिकाणी लावलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हेहोर्डिंग एका खासगी जाहिरात एजन्सीकडून लावण्यात आले आहेत. tv9 मराठीने याबाबत वृत्त दिले आहे.
एकीकडे महाराष्ट्रातीलकोरोना रुग्णांच्या संख्येने चीनलाही मागे टाकले आहे. दुसरीकडे खासगी जाहिरातएजन्सीच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिमा उंचावण्याचे प्रयत्नसुरु आहेत. राज्यातील मुंबई, पुण्यासह आतामालेगाव आणि औरंगाबाद ही कोरोना व्हायरसची हॉटस्पॉट बनली आहेत. या शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून हा सर्वांच्याच चिंतेचा विषय झालाआहे.
“…अन्यथा कोरोनाचा विजय होईल”, अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली चिंता
मंगळवारी (9 जून) 1663 कोरोनाबाधितरुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलं. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंतराज्यभरात 42 हजार 638 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचा वेग राज्यातवाढताना दिसत आहे. काल कोरोनाच्या 2259नव्या रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातीलकोरोनाबाधितांचा आकडा 90 हजार 787 इतका झाला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
