Share

वानाडोंगरी नगरपरिषदेसाठी 15 ऐवजी 19 जुलैला मतदान : राज्य निवडणूक आयोग

Published On: 

मुंबई : न्यायालयीन प्रकरणामुळे वानाडोंगरी (जि. नागपूर) नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आता 15 ऐवजी 19 जुलै 2018 रोजी मतदान होणार आहे; तसेच 15 जुलै 2018 रोजी मतदान होणाऱ्या वडगाव (पुणे), मुक्ताईनगर (जळगाव), बार्शीटाकळी (अकोला) आणि पारशिवनी (नागपूर) या नगरपंचायतींसाठी वानाडोंगरीसोबतच 20 जुलै 2018 रोजी मतमोजणी होईल.

राज्य निवडणूक आयोगाने 15 जून 2018 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार 15 जुलै 2018 रोजी मतदान होणार होते; परंतु वानाडोंगरी येथील विविध 5 जागांसंदर्भातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयात अपील दाखल झाले होते. ते जिल्हा न्यायालयाने 6 व 7 जुलै 2018 रोजी फेटाळले; परंतु निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक कालावधी देणे गरजेचे असल्याने आयोगाने सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे.

सुधारित कार्यक्रमानुसार आता फक्त वानाडोंगरी नगरपरिषदेकरिता 19 जुलै 2018 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान; तर 20 जुलै 2018 रोजी मतमोजणी होईल. त्यामुळे वडगाव (पुणे), मुक्ताईनगर (जळगाव), बार्शीटाकळी (अकोला) आणि पारशिवनी (नागपूर) या नगरपंचायतींचीदेखील मतमोजणी 16 ऐवजी 20 जुलै 2018 रोजी होईल, असे राज्य निवडणूक आयोगाकडून कळविण्यात आले आहे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!