Share

राजकारण्यांनो आता तरी सुधरा, हे नसते उद्योग बंद करा! ‘घोडेले’ प्रकरणावर लोकांनी व्यक्त केला संताप

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : माजी महापौर नंदकुमार घोडेले यांचा ४ मे रोजी वाढदिवस होता. आपला वाढदिवस त्यांनी मोठ्या दिमाखात, ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत साजरा केला. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय भाजपच्या कार्यकर्त्यांवर आंदोलन प्रकरणी, खा. इम्तियाझ जलील तसेच शिवसेनेचे आ. संजय शिरसाठ यांच्यावरही विकासकामांच्या उद्धाटन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकीकडे कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी लोकांचे व्यवसाय, रोजी-रोटी बंद केली आहे दुसरीकडे रोज चिता पेटत आहेत. आणि या परिस्थितीत राजकारण्यांचे हे उद्योग निर्लज्जपणाचा कळस आहेत. असा संताप सोशल मिडीयावर व्यक्त केला जात आहे.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून संपूर्ण राज्यभरात कडक निर्बंध लागू करण्यात आले असून सर्वांनी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन त्यांच्याकडून सातत्याने केले जात आहे. पण औरंगाबादेत उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या म्हणजेच शिवसेनेच्या माजी महापौरांनीच त्यांच्या या निर्णयाची खिल्ली उडवली आहे. नंदकुमार घोडेले यांनी बुधवारी (दि.५) आपला वाढदिवस जंगी पद्धतीने ढोल ताशांच्या आतषबाजीत साजरा केला.

यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमवण्यात आली होती. या स्वागत समारंभामध्ये कोरोना काळातील नियमांचा भंग करण्यात आला. शहराचे प्रथम नागरिक नियमांचे उल्लंघन करत आहेत. तर यांना शहाणपणा शिकवणार कोण? असा प्रश्न माझ्या सारख्या सामान्य नागरिकाला पडतो. कोरोनामुळे लोक मरत असतांना जबाबदार पदावरील नेत्याला आनंदोत्सव कसा साजरा करावा वाटतो? , लॉकडाऊन हा फक्त आम्हा सामान्य नागरिकांसाठीच आहे का ? अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया सोशल मिडीयावर उमटतांना दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!