Share

रोहित पवारांनी फिरवली जादूची कांडी, भाजपला मोठा धक्का

Published On: 

जामखेड : कर्जत जामखेडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांच्यातील राजकीय संघर्ष अजूनच पेटल्याचे चित्र आहे. जामखेड नगरपालिकेचे नगराध्यक्ष निखिल घायतडक यांच्यासह दहा नगरसेवक आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती नगराध्यक्ष निखिल घायतडक यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली. हा राम शिंदे आणि भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.

जामखेड नगरपालिकेचे नगराध्यक्ष निखिल घायतडक यांनी मागील आठवड्यात राजकीय दबावापोटी नगराध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले होते. त्याच वेळी अन्य दहा नगरसेवकांनी आपल्याकडे नगरसेवक पदाचे राजीनामे दिलेले आहेत, असेही त्यांनी जाहीर केले होते. मात्र, त्यानंतर अनेक राजकीय बैठका गुप्तगू होऊन अखेर हे राजीनामानाट्य पक्षांतराच्या वळणावर जाऊन पोहोचले.

नगराध्यक्ष घायतडक यांच्यासह दहा नगरसेवक दोन दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करणार असल्याचे त्यांनी जाहीर केली. त्यामुळे तूर्तास राजीनामा नाट्यावर पडदा पडला आहे. नव्याने पक्षांतराचे वारे वाहू लागले आहेत. नगराध्यक्ष घायतडक यांच्यासह हे सर्व नगरसेवक माजी मंत्री राम शिंदे यांचे समर्थक होते.

गेल्या काही महिन्यांपासून राजकीय दबाव येत असल्याने पदाचा राजीनामा देण्याचे जाहीर केले होते. यामुळे समर्थक दहा नगरसेवकांनी देखील तातडीने आपल्या नगरसेवक पदांचे राजीनामे माझ्याकडे दिले होते. दरम्यान नगराध्यक्ष कधी राजीनामा देतात याकडे भाजपचे लक्ष होते. परंतु त्यांनी आपला राजीनाम्याचा निर्णय फिरवत पुन्हा राष्ट्रवादीतच राहण्याचा निर्णय घेऊन साडेतीन वर्षांपासून भाजप बरोबर असलेले संबध तोडले आहेत. असे नगराध्यक्ष घायतडक यांनी सांगितले आहे.

मानलं मुख्यमंत्री साहेब ! घरचं दुखः बाजूल ठेवून घेतली शिक्षण विभागाची बैठक

नगराध्यक्ष निखल घायतडक यांनी दोन वषार्पूर्वी नगरपरिषदेचे नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी होते. त्यानुसार निखिल घायतडक नगराध्यक्ष झाले होते. गेल्या तीन महिन्यांपासून निखिल घायतडक यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, यासाठी दबावतंत्र चालू होते. लॉकडाऊनमुळे थांबलेले दबावतंत्र दोन दिवसात पून्हा सूरू झाले. याबाबत नगराध्यक्षांनी आपल्या सहकारी नगरसेवकांना याची कल्पना दिली. त्यानुसार माजी नगराध्यक्षा प्रीती विकास राळेभात, नगरसेवक शामीर सय्यद, संदीप गायकवाड, ऋषिकेश बांबरसे, गूलशन अंधारे, लता संदीप गायकवाड, सुरेखा भाऊराव राळेभात, सुमन आशोक शेळके , मेहरुनिसा शफी कूरेशी, जकीया आयुब शेख, या दहा नगरसेवकांनी आपले राजीनामे नगराध्यक्ष निखिल घायतडक यांच्याकडे दिले होते.

आमदार रोहित पवार यांनी जादूची कांडी फिरवून नगराध्यक्षांसह 10 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन घेतल्याने माजी मंत्री राम शिंदे यांच्या हाती सत्तेची सूत्रे असलेल्या जामखेड नगरपालिकेच्या राजकारणाला ‘सुरुंग’ लावला आहे.

सर्व राजकीय पक्षांनी मतभेदांना मूठमाती देऊन कोरोनाविरुद्धचे युद्ध एकत्र लढावे – अमित शहा

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!