🕒 1 min read
मुंबई : दसऱ्याच्या दिवशी अधिकाऱ्यांनी काही गुंडांना हाताशी धरुन नील सोमय्या आणि त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप करत यासंदर्भात भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांविरोधात नवघर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच यावेळी पोलीस आणि महापालिका अशा दोघांनीही हे मान्य केलं की त्यांच्याकडे कोणताही कायदेशीर आदेश नव्हता, असा दावाही त्यांनी केला आहे.
यासंदर्भात बोलतांना सोमय्या म्हणाले की,’पोलीस आणि महापालिका अशा दोघांनीही कबूल केलं आहे की त्यांच्याकडे कोणतीही कायदेशीर आदेश नव्हता. ते विदाऊट एनी सिक्युरिटी कन्सेंट परमिशन तुमच्या परिसरात घुसले. म्हणून दोघांनीही बेकायदेशीर कृत्य केल्याबद्दल यासंबंधात एफआयआर रजिस्टर करून पोलिसांनी दोन्ही संबंधित अधिकारी आणि त्यांच्यासोबत आलेल्या अर्धा डझन गुंडांविरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी सोमय्या यांनी केलीय. महत्वाची बाब म्हणजे सत्ताधारी पक्षांचे दोन गुंड सुद्धा त्यात होते. जर मी वेळेवर पोहोचलो नसतो तर कार्यालयाची नासधूस केली असती. त्यामुळे मला यासंबंधी चौकशी आणि कारवाई हवी आहे.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’१९ सप्टेंबरला याच मुलुंड, नवघर पोलिसानी बेकायदेशीरपणे मला सहा तास कोंडून ठेवले त्याचीही तक्रार या पोलीस स्टेशन केली होती. आज एक महिना झाला तरीही त्यानजी काहीच केले नाही. सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन प्रमाणे त्यांनी तक्रार रिजेक्ट करावी किंवा एफआयआर दाखल करावा. तसेच मुंबई पोलिसांनी त्याची चौकशीही केली नाही, याचा अर्थ हे पोलिसांचे माफियागिरी करत आहेत. हा प्रकार आपण खपवून घेणार,’ असेही यावेळी सोमय्या म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘ब्लड प्रेशर आणि डायबिटीसचा त्रास मागे लावून घ्यायचा नव्हता म्हणून मी गृहमंत्री नाकारले’
- ‘अंगूठा छाप’ मोदींमुळे आज देशाला ;हे’ भोगावं लागतंय; काँग्रेसची मोदींवर वादग्रस्त टीका
- पेट्रोल-डिझेल सस्ता चाहीए की नहीं? विचारत सत्ता मिळवली; इंधन दरवाढीवरुन राऊतांचा मोदींना टोला
- पवार साहेब, हर्बल तंबाखूच्या उत्पादनाला परवानगी द्या, शेतकरी श्रीमंत होईल- सदाभाऊ खोत
- ‘रवी राणांनी जे केलंय ते चिल्लरगिरी, स्वतःला शेतकऱ्यांचं कैवारी समजतात आणि पदोपदी नौटंकी’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
