तुळजापूर : कोरोना व्हायरसचा फैलाव रोकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. यास देशभरात जनतेकडून न भूतो न भविष्यती असा प्रतिसाद मिळाला.
सरकारने जाहिर केलेल्या आदेशांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी मोठ्याप्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. वर्दीतील हे पोलीस आपलं कर्तव्य पार पाडताना माणुसकीचं दर्शन घडवतात तेव्हा अश्या असामान्य व्यक्ती कौतुकास पात्र ठरतात.
जनता कर्फ्यु च्या काळात
तिर्थक्षेञ तुळजापूर शहरातील मतिमंद अन्याथ मंडळीना भुक लागली असता त्यांना काहीही मिळत नसल्याचे पाहुन तैनात असलेल्या पोलिसांनी स्वताचा खाण्यासाठी आणलेला जेवणाचा डबा या मतिमंद मंडळी देवुन त्यांची भुक भागवुन तुळजापूर पोलिसांनी माणुसकिचे दर्शन घडवले.
या बाबतीत अधिक माहीती अशी की तिर्थक्षेञ तुळजापूर येथेजनता कर्फ्यू चालु असताना पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळी सात वाजल्यापासून सर्वत्र दुकाने बंद होती. शहरात सर्वत्र शुकशुकाट दिसून येत होता या पार्श्वभूमीवर खाण्यास काही मिळत नसल्याचे पाहुन अनाथ मतिमंद मंडळी सैरभर झाले.
त्यातच त्यांना भुक लागल्यामुळे उसाची ट्रक दिसताच त्यामागे धावत असताना पो काँ महादेव पाटील यांना हे दृश्य पहावलं नाही.
पाटील त्यांच्या जवळ जाऊन माहिती घेतली असता त्यांना भुक लागल्याचे कळताच त्यांनी घरुन डबे मागवुन मतिमद वेडसर मंडळीना खाण्यास दिले, पिण्यास पाण्याचा बाटल्या दिल्या व या मंडळीची पोटाची भुक भागताच हि मंडळी शांत झाली.
बसस्टँन्ड व सावरकर चौकात असलेल्या मतिमंद मंडळीना पो काँ महादेव पाटील पीएसआय रोटे झींजुर्ड रोटे, यांनी तुळजापूर बंद असताना भुकेने व्याकूळ झालेल्या भिकाऱ्याला जेवणाची सोय करून दिली त्यामुळे पोलिसांमधील माणुसकीचे उत्तम उदाहरण दिसून येत आहे.
कोरोना सारखा भयानक व्हायरस आज महाराष्ट्रामध्ये आला आहे. तरी समाजाच्या हितासाठी पोलिस यंत्रणा हे उत्तम कार्य करत असल्याचे दिसून येत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

