Share

सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान मोदी साधणार संवाद, लॉकडाऊनबाबत होणार चर्चा

Published On: 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पुन्हा एकदा लॉकडाऊनबाबत चर्चा करणार आहेत. तर प्रत्येक राज्यात कोरोनाच्या संसर्गाची काय परिस्थिती आहे, याचा आढावा घेणार आहेत. देशातील दुसऱ्या लॉकडाऊनचा कालावधी संपण्यासाठी आठवडा शिल्लक आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.

आज सकाळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांसह बातचीत करतील. 11 एप्रिल रोजी मागच्या संवादाच्या वेळी अनेक मुख्यमंत्र्यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन, जो 14 एप्रिल रोजी संपणार होता, वाढवण्याची शिफारस होती. त्यानंतर पंतप्रधानांनी 14 एप्रिलला लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती.

तर त्याआधी पहिल्या लॉकडाऊनच्या घोषणेआधी म्हणजेच 20 मार्च रोजी पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांसोबत बातचीत केली होती. त्यावेळी मोदींनी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उपाययोजनांवर चर्चा केली होती. केंद्र आणि राज्य सरकार अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि नागरिकांना काहीसा दिलासा देण्यासाठी विविध ठिकाणी लॉकडाऊनचे नियम शिथिल करत आहे. परंतु कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी तसंच प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही राज्ये लॉकडाऊनचा कालावधी 3 मेनंतरही कायम ठेवण्याबाबत आग्रही असल्याचं म्हटलं जात आहे.

महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या ही सर्वाधिक आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढणार असल्याची शक्यता आहे. मात्र काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन शिथिल करण्यात येणार आहे. त्यामुळे काही दुकानं , छोटे-मोठे उद्योगधंदे पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. उद्योगधंदे सुरु झाले तरी कमी कामगारांमध्ये कारभार करवा लागणार आहे. तर सोशल डीस्टसिंगचे पालन करावे लागणार आहे.

बाळासाहेबांच्या जिवलग ‘सामना’बद्दल या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!