नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा देशातील जनतेशी संवाद साधणार साधला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा केली असून २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी आज संवाद साधला. यावेळी त्यांनी २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा करताना हे पॅकेज जीडीपीच्या १० टक्के असल्याची माहिती दिली. आर्थिक पॅकेज जाहीर करताना प्रत्येकाचा विचार करण्यात आल्याचं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं आहे.
सोमवारीच पंतप्रधान मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी राज्या राज्यांमधील कोरोनाबाबत आढावा घेतला. यावेळी मोदींनी ग्रामीण भागाला वाचवा भविष्यात अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी ग्रामीण भागच कमी येणार आहे, अशा सूचना दिल्या होत्या.
या बैठकीत अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवण्यात यावा अशी मागणी केली. यामध्ये पंजाब, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र या राज्यांचा सहभाग होता. त्यामुळे आज पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवण्याबाबत निर्णय घेणार का ? असा प्रशन विचारला जात असताना मोदींनी चौथ्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. १८ मे पूर्वी हा लॉकडाऊन कसा असेल याची माहिती दिली अस अस मोदींनी यावेई सांगितलं.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
