Share

मोदींनी केला पालखी मार्गाच्या कामाचा उल्लेख; फडणवीस म्हणाले, ‘नवा भारत…’

Published On: 

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणासीतील काशी येथे कालभैरव मंदिरात जाऊन आरती केली. या पूजेच्या कार्यक्रमानंतर मोदींच्या हस्ते काशी विश्वानाथ धामचं लोकार्पण करण्यात आले. दरम्यान देशभरात आपली परंपरा जपण्यासाठी जी विविध कामे होत आहेत, त्यात पालखी मार्गाच्या कामाचाही उल्लेख पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi)केला. याचेच कौतुक विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(  Devendra Fadnavis) यांनी केले आहे.

विरासत आणि विकास, परंपरा आणि सामर्थ्य नवा भारत असा आहे. देशभरात आपली परंपरा जपण्यासाठी जी विविध कामे होत आहेत, त्यात पालखी मार्गाच्या कामाचाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उल्लेख केला. ॥ जय हरी विठ्ठल ॥ असे ट्वीट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

दरम्यान काशी विश्वनाथ कॉरीडॉरचे उद्घाटन करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी काशी विश्वनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात पूजा केली. गंगास्थान केले तसेच मंदिर परिसरात वृक्षारोपण देखील केले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता कर्मचारी आणि कामगारांवर पुष्प वर्षाव करून त्यांचा सन्मान देखील केला. दरम्यान काशी विश्वनाथ कॉरीडॉर या प्रकल्पाच्या फेज 1 या प्रकल्पाची किंमत साधारण 339 कोटी इतकी आहे. हा प्रकल्प काशी विश्वनाथ मंदिर आणि गंगेचा वाराणसीमधला किनारी प्रदेश यांना जोडणारा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!