Share

अन्न वाया घालवू नका,मोदींचे देशवासियांना आवाहन

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- अन्न वाया घालवू नका, ऊर्जा आणि पाण्याची बचत करा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना केलं आहे. दसऱ्यानिमित्त काल नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की अन्न वाया न घालवणे आणि एकदाच वापराचे प्लास्टिक टाळणे याची मोहिम हाती घेऊन महात्मा गांधी यांना त्यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त लोकांनी आदरांजली वाहावी. महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांचा सन्मान राखण्यातून नवरात्रीच्या उत्सवाची भावना साजरी करावी असंही मोदी यांनी आग्रहानं सांगितलं.

दरम्यान,जळगाव इथल्या दसरा महोत्सवात रावण पुतळ्याच्या दहनाची मागील शेकडो वर्षांपासूनची परंपरा कायम राखत. दरवर्षी प्रमाणे यंदाही काल रात्री रावण दहन कार्यक्रम पार पडला. यावेळी रोषणाई आणि आतषबाजीने मेहरूण तलाव परिसर उजळून निघाला होता.

जालन्यातही वर्षी दसरा उत्सव समितीच्या वतीने रावणाच्या प्रतिमेचं दहन करण्यात आले. तत्पूर्वी मुलींनी सादर केलेल्या लेझीमच्या प्रात्यक्षिकांनी लोकांची मनं जिंकली.

नांदेड शहरातील भगवान बालाजी मंदिरात दसऱ्यानिमित्त दिवसभरात एक लाख लोकांनी बालाजीचं दर्शन घेतलं. सायंकाळी बालाजी यांच्या मुर्तीसह रथयात्रा काढण्यात आली होती. सचखंड गुरूव्दारात दसरा महोत्सवानिमित शस्त्र बाहेर काढून गोदावरीच्या पाण्याने त्यांची पुजा करण्यात आली. अनेक राज्यातील लोक दसऱ्यानिमित्त नांदेडमध्ये येत असतात.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!