अखिलेश कुलकर्णी : आज लॉकडाऊन च्या ९ व्या दिवशी सकाळी ९ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेशी संवाद साधला. १३० कोटी जनतेच्या भारतमातेसाठी, सुदृढतेसाठी, सेवेसाठी २१ दिवसांच्या लॉकडाऊन मधील पुढील दिवसात कटाक्षपणे घरी राहून कोरोनाला एकत्र हरवण्याचे आवाहन केले आहे.
यासोबतच, येत्या रविवारी ५ एप्रिलला जनता कर्फ्यू च्या यशानंतर आता कोरोनाशी लढ्यासाठी कोणालाही एकटं वाटू नये, खंबीर रहावं म्हणून अजून एक मागणी मोदींनी जनतेकडून केली आहे. ती म्हणजे, रविवारी ५ एप्रिलला रात्री ९ वाजता सर्वांनी ९ मिनिटे लाईट बंद करून दिवा, मेणबत्ती, टॉर्च, मोबाईल फ्लॅशलाईट, इत्यादींनी प्रकाश करून या कोरोनाच्या अंध:काराला दूर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
तसेच यावेळी त्यांनी सुचना देखील केली कि, कोणीही रस्त्यावर न उतरता, सामुहिकपणे न जमता, सोशल डिस्टनसिंग चे पालन करत घराच्या दारातून, बाल्कनीमधून सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, देशात २५४३ तर महाराष्ट्रात ४२३ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. या सोबतच गेल्या २ दिवसात देशात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काल सर्व राज्यांच्या मुख्यमंत्रीशी पंतप्रधान यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधला होता, यात त्यांनी अनेक सुचनांसह कोरोनांच्या रॅपिड टेस्ट ला देखील परवानगी दिली. या टेस्ट नुसार ५ मिनिटांत प्राथमिक अहवाल प्राप्त होऊ शकतो.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

