नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अनलॉक २ ची घोषणा करण्यात आली आहे. आपण करोनाशी लढताना आता अनलॉक २ मध्ये प्रवेश करतो आहोत. अशात पावसाळा आला आहे तेव्हा स्वतःची काळजी घ्या असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. वेळेवर केलेलं लॉकडाउन आणि इतर महत्त्वाचे निर्णय यामुळे भारतात करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात राहिला. अनलॉक १ मध्ये काही प्रमाणात निष्काळजीपणा वाढताना पाहण्यास मिळाला. हे योग्य नाही असंही मोदींनी म्हटलं आहे. लॉकडाउन सुरु झाल्यानंतर अत्यंत गांभीर्याने नियमांचं पालन करण्यात आलं. आता पुन्हा एकदा राज्य सरकारांना, देशाच्या नागरिकांना आणि संस्थांना अशाच प्रकारची सतर्कता बाळगणं गरजेचं आहे.
दरम्यान, प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजनाचा कालावधी नोव्हेंबर पर्यंत वाढवला जाणार असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. लॉकडाऊनच्या संकटाशी निपटण्यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण योजना लागू करण्यात आली. या योजनेंतर्गत गरिबांना पावणे दोन लाख कोटींचं पॅकेज दिलं गेलं. गेल्या तीन महिन्यांत जन धन खात्यांत ३१ हजार कोटी रुपये जमा करण्यात आले. अस पंतप्रधान म्हणाले आहेत. तर गरिबांची चूल पेटते या सगळ्यांचे श्रेय शेतकरी आणि करदात्यांना असल्याचे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
मोठी बातमी : गुन्हा मागे नाहीतर… इंदुरीकर महाराजांचे समर्थक भडकले
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशवासियांना उद्देशून भाषण केलं. संध्याकाळी चार वाजता मोदींने देशाशी संवाद साधला. कोरोना व्हायरसनं भारतात शिरकाव केल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वेळा देशाला उद्देशून भाषण केलंय. गेल्या महिन्यात म्हणजे 12 मे रोजी 20 लाख कोटींचं आत्मनिर्भर पॅकेज जाहीर करताना मोदींना देशवासियांना उद्देशून शेवटचं भाषण केलं होतं.
भारत सरकारनं कालच म्हणजे 30 जून रोजी 59 चिनी अॅप्सवर बंदी आणली. हॅलो, टिक टॉक, यू ब्राऊजर अशा प्रसिद्ध अॅप्सचाही त्यात समावेश आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारनं चिनी अॅप्सवर बंदीचा निर्णय घेतला. दुसरीकडे, भारतातील कोरोना रुग्णांच्या संख्येनंही लाखोंचे टप्पे पार केलेत. शिवाय, दिल्ली, महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये रुग्णवाढीचा दरही गंभीर आहे. यावर नरेंद्र मोदी काय बोणार याकडे देशाचे लक्ष लागले होते. मात्र मोदींनी यावर चकार शब्द देखील काढला नाही.
भारत देश लवकर करोनामुक्त होवो,पार्थ पवारांची तुकोबारायांच्या चरणी प्रार्थना

