अहमदनगर : प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख ( इंदुरीकर ) यांनी कीर्तनातून वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवरून संगमनेर कोर्टात PCPNDT अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंदुरीकर महाराज यांच्या विरोधात संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवरून संगमनेर कोर्टात PCPNDT अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाची 3 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे इंदुरीकर समर्थक आता आक्रमक झाले आहे. आज इंदुरीकर समर्थकांनी संगमनेर तहसील कार्यालयात निवेदन दिले आहे. इंदुरीकर यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी केली आहे. जर इंदुरीकर महाराजांवरील गुन्हा मागे घेण्यात आला नाहीतर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही समर्थकांनी दिला आहे.
इंदोरीकर महाराज यांनी आपल्या कीर्तनात ‘स्त्रीसंग सम तिथीला झाला, तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते’ असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. इंदुरीकरांच्या किर्तनाचा व्हिडिओ ‘मराठी कीर्तन व्हिडिओ’ या युट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आला होता. या व्हिडिओ इतर सोशल माध्यमांवरही चांगलाच गाजला होता. त्यावरून त्यांच्यावर अनेकांनी टीकाही केल्या होत्या.
हाॅटस्टारची मोठी घोषणा : बाॅलिवूडचे आगामी 7 बिग बजेट सिनेमे दिसणार OTTवर
या विधानावरून इंदुरीकर यांनी PCPNDT कायद्याच्या कलाम 22 चं उल्लंघन असल्याचा आरोप करत अहमदनगर इथल्या PCPNDT च्या सलागर समितीच्या सदस्यानि त्यांना नोटीस पाठवली होती. यावर इंदुरीकर महाराज यांनी आपल्या वकिलांन मार्फत बाजू मंडली होती. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या रंजना गावंदे यांनी नोटीस दिली हाती. त्यामध्ये प्रशासनाने गुन्हा दाखल न केल्यास तुम्हालाही दोषी धरण्यात येईल अशी नोटीस दिली होती.
त्यामुळे अखेर 19 जूनला संगमनेर इथल्या वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांनी कोर्टात गुन्हा दाखल केला. खरंतर इंदुरीकरांच्या या विधानामुळे वाद चांगला तापला होता. कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या विधानावरून सुरू असलेला वाद थांबता थांबेना, असंच चित्र होतं. यात भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यादेखील आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी आपल्या वकिलामार्फत इंदुरीकर महाराजांना कायदेशीर नोटीस पाठवली होती.
भारत देश लवकर करोनामुक्त होवो,पार्थ पवारांची तुकोबारायांच्या चरणी प्रार्थना

