Share

विद्यार्थ्याच्या गुणवत्ता वृद्धीसाठी नियोजनपूर्वक प्रयत्न करण्यात येतील – गायकवाड

Published On: 

मुंबई – कोरोना संसर्गामुळे गेलं दीड वर्ष बंद असलेल्या राज्यातल्या शाळा काल पुन्हा सुरू झाल्या. ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते सातवीचे वर्ग तर शहरी भागात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरु झाले. खूप दिवसांनी शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं.

प्रदीर्घ कालावधीसाठी शाळा बंद असल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याची शैक्षणिक गरज, उपलब्ध शैक्षणिक साधनसुविधा, आणि कुवत या नुसार विद्यार्थ्याच्या गुणवत्ता वृद्धीसाठी नियोजनपूर्वक प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काल दिली.

ऑनलाईन,ऑफलाईन पद्धतीनं शिक्षण सुरु राहण्यासाठी ‘माझे विद्यार्थी माझी जबाबदारी’ या अभियानाच्या माध्यमातून सातत्यपूर्ण अध्ययन आराखड्याचा प्रारंभ करत असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं. यामध्ये अध्यापनाचं नियोजन, वेळापत्रक, उपस्थिती, साहित्य, पालक सहभाग, मूल्यमापन, अभ्यासेतर नियोजन, शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, शैक्षणिक सुविधा, शारीरिक आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!