Share

पिंपरी-चिंचवडकरांची पाण्याची चिंता मिटणार; पवना धरणाच्यासाठ्यात तब्बल ‘एवढा’ पाणीसाठा

Published On: 

पिंपरी – चिंचवड : पुणे शहराला पाणीपुरवठा व सिंचनासाठी वापर होणाऱ्या खडकवासला आणि पानशेत धरणात १००% पाणीसाथ झाला असून विसर्ग सुरु आहे. तर, याच धरण साखळीतील वरसगाव व टेमघर हि धरणे देखील लवकरच भरतील त्यामुळे पुण्याचा पाणीप्रश्न सुटला आहे.

पुण्यासोबतच पिंपरी-चिंचवड शहराला व मावळ तालुक्यातील सिंचनासाठी महत्वाच्या असणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठ्यात देखील चांगली वाढ होत आहे. आज सकाळी आलेल्या माहितीनुसार पवना धरण ८५.७५ टक्के भरले आहे. गेल्यावर्षी याच काळात धरणात १०० % इतका पाणीसाठा होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणाच्या पाणीसाठयात हळूहळू वाढ होत असली तरी पावसाचा जोर कायम राहिल्यास येत्या काही दिवसात हे धरण देखील पूर्ण भरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिर्डीच साई मंदिर चालू करा, अन्यथा कोर्टात जाणार: खासदार सुजय विखे पाटील आक्रमक

दरम्यान, गेल्या २४ तासात ३.३३ % इतकी वाढ पाणीसाठ्यात झाली आहे, तर या मौसमात जून पासून ५०.४६ टक्के एवढी एकूण वाढ धरणातील पाणीसाठ्यात झाली आहे. खडकवासला साखळी धरण प्रकल्पातील खडकवासला धरणात १.९७ टीएमसी/१००%, पानशेत : १०.६५ टीएमसी/१००%, वरसगाव : १२.३० टीएमसी/९५.९६%, टेमघर : २.९७ टीएमसी/८०.०३% एवढ्या पाणी साठ्याची नोंद आज सकाळी ६ वाजेपर्यंत करण्यात आली आहे.

…तर दोन वर्षाच्या आतच करोनाचा खात्मा करता येऊ शकतो

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!