Share

राज्यात आणखी 5 ठिकाणी कोरोना चाचणी ‘लॅब’ला परवानगी

Published On: 

पुणे : महाराष्ट्र्रात कोरोना बधितांची संख्या 97 वर पोहचली आहे.राज्यात नव्याने ८ रुग्ण आढळले असून यामध्ये मुंबईत ३, सांगलीत ४ तर साताऱ्यात एक रुग्ण आढळला आहे, आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुपारी जनतेशी संवाद साधताना राज्यात आजपासून संचारबंदी लागू करण्यात आल्याची घोषणा केली.

राज्यातील ही वाढती संख्या लक्षात घेता राज्यसरकारने आणखी 5 ठिकाणी कोरोना चाचणीसाठी लॅब सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. आरोग्य विभागाकडून नुकतीच ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पाचही लॅब मुंबईतील काही भागात आहेत. नवी मुंबईतील थायरोकेअर टेक्नॉलॉजी लिमिटेड, सबरबन डायग्नोस्टीक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मेट्रोपोलीस हेल्थकेअर लिमिटेड, सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि एसआरएल लिमिटेड या पाच ठिकाणी कोरोना चाचणी साठी लॅब सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यावेळी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. ‘महाराष्ट्र कोरोनाच्या धोकादायक उंबरठ्यावर आहे. बिकट परिस्थिती आणायची नसेल तर सरकारचे निर्देश काटेकोरपणे ऐका. पुढचे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. ती भीती लक्षात घेऊच आपण संचारबंदी लागू करत आहोत, असंही उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य तसंच इतर आवश्यक सेवा सुरु राहतील. मात्र ते वगळून पूर्ण संचारबंदी असेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!