Share

राज्यातील जनता योग्य वेळी मला ‘पुन्हा’ सत्तेत आणेल; फडणवीसांना गाढा विश्वास

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ‘शिवसेना आणि भाजपा आज एकत्र असते तर आमच्या समोर भांडायलाही कोणी उरलं नसतं. भांडायचं झालंच तर केवळ शिवसेना आणि भाजपाच राहिले असते अशी परिस्थिती निर्माण झाली असती,” असं मत माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं

याबाबत त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी बोलताना फडणवीस यांनी अनेक मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केलं. पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘योग्य वेळी राज्यातील जनता मला पुन्हा सत्तेत आणेलच,’ असा गाढा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘विधानसभा निवडणुकीत आम्ही स्वतंत्रपणे लढलो असतो तरीही १४४ चा जादुई आकडा गाठता आला असता. आमची तेवढी ताकद होती. राज्यातील जनतेने मला पुन्हा सत्तेत आणले होते. पण राजकीय वजाबाकीने घरी बसविले व विरोधी पक्षनेतेपद स्वीकारावे लागले. जनतेचा आशीर्वाद वाया जात नाही,’ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, लोकसभा निवडणुकांपूर्वी शिवसेना आणि भाजपादरम्यान ५०-५० टक्के जागा लढवण्यावर चर्चा झाली होती आणि एकमतही झालं होतं. परंतु राज्यातील मुख्यमंत्रीपदाबाबत आमची कोणतीही चर्चा झाली नव्हती. लोकसभेच्या निवडणुकांनंतर परिस्थिती बदलली. त्यामुळे विधानसभेबाबत चर्चा करताना शिवसेनेनं काही प्रमाणात कमी जागा घेण्याचा प्रस्ताव स्वीकारला. पण त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरला,” असं फडणवीस यांनी सांगितलं.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!