🕒 1 min read
औरंगाबाद: असे का होते की जेव्हा जेव्हा निवडणुका जवळ येतात तेव्हा तुम्ही मराठी बोर्ड, कर्नाटक सीमा विवाद, मराठी अस्मिता इत्यादींबद्दल बोलतात. लोक मूर्ख नाहीत की त्यांना या नौटंकी समजत नाहीत. मराठी पाट्या लावून मराठी तरुणांना नोकऱ्या देणार का? हा एक मिलियन डॉलरचा प्रश्न आहे. अशी टीका औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील(Imtiyaz Jaleel) यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.
मराठी अस्मिता टिकवण्यासाठी राज्य सरकारने मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता सर्व दुकानांवरच्या पाट्या या मराठी भाषेतच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नुकतेच मंत्रीमंडळाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनयमन) अधिनियम, २०१७ यात सुधारणा करण्याचा व पळवाट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मोठ्या दुकांनाप्रमाणेच छोट्या दुकानावरील पाट्याही आता मराठीत कराव्या लागतील.
असे का होते की जेव्हा जेव्हा निवडणुका जवळ येतात तेव्हा तुम्ही मराठी बोर्ड, कर्नाटक सीमा विवाद, मराठी अस्मिता इत्यादींबद्दल बोलतात, लोक मूर्ख नाहीत की त्यांना या नौटंकी समजत नाहीत. मराठी पाट्या लावून मराठी तरुणांना नोकऱ्या देणार का, हा एक मिलियन डॉलरचा प्रश्न आहे. @CMOMaharashtra https://t.co/qq1NIFAmLX
— Imtiaz Jaleel (@imtiaz_jaleel) January 12, 2022
मराठीत-देवनागरी लिपितील अक्षरे दुसऱ्या इंग्रजी किंवा अन्य लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशीही दुरुस्ती मंजूर करण्यात आली आहे. मात्र आता यावर औरंगाबादचे खासदार आणि एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी सडकून टीका केली आहे. निवडणुका जवळ आल्यानंतरच सरकार अशा प्रकारचे निर्णय घेते. तसेच सामान्य नागरिकांना सीमावाद, जातीयवाद, मराठी प्रश्न इत्यादींमध्ये अडकवण्यात येते. अशी टीका करत असतांनाच पुढे या मराठी पाट्या लावल्यानंतर रोजगाराचा प्रश्न सुटणार आहे का? असा खोचक सवाल त्यांनी ठाकरे सरकारला उपस्थित केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
-
चोरीवर ‘वेलांटी’ असली तरी कोणतीच ‘मात्रा’ नाही- संजय राऊत
-
‘शेतकऱ्यांसाठी पैसा नसतो, मात्र स्वतःच्या आमदारासाठी कोट्यवधींची माफी?’; केशव उपाध्ये यांचा ठाकरेंना सवाल
-
औरंगाबाद जिल्ह्यातील इंग्रजी शाळा उघडणार; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मेस्टाचा निर्णय!
-
आधुनिक व्हा मात्र आपल्या परंपरा जपा; खेळाच्या मैदानातून शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंचा युवकांना सल्ला..!
-
‘पुष्पा’ सिनेमातील हटके लूकमध्ये रवींद्र जडेजाला पाहून,अल्लू अर्जुनने केली कमेंट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
