Share

मुंबईतील जुन्या वास्तूंच्या रिस्टोरेशनसाठी दरवर्षी १० कोटींचा निधी दया – जयंत पाटील

Published On: 

🕒 1 min read

मुंबई  – मुंबईतील जुन्या इमारती आणि ऐतिहासिक वास्तूंच्या रिस्टोरेशन आणि संवर्धनासाठी ८ ते १० कोटी रुपयांचा निधी दरवर्षी मिळावा अशी मागणी विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते आणि माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेत केली.

राज्यातील पर्यटन या विषयावर आमदार जयंत पाटील यांनी सभागृहामध्ये सविस्तर चर्चा केली. त्यांनी काही सूचना केल्याच शिवाय ते मुंबईचे पालकमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री असताना पर्यटनासाठी केलेल्या तरतुदींची आठवणही त्यांनी सभागृहात करुन दिली.

राज्याच्या पर्यंटनासाठी सर्वकष अशी पॉलिसी सरकारने आणण्याची गरज आहे. मुंबई सागरी किनाऱ्यावर पर्यंटनाच्यादृष्टीने चांगला विकास झाला असे दाखवले जात आहे. परंतु आज दादर येथील समुद्रकिनाऱ्याची धूप होत असल्याचे सांगितले जात आहे. मुंबईला ११४ किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला असून महाराष्ट्र सागरी मंडळाने या किनाऱ्यांच्या देखभालीची जबाबदारी सिंगापूरच्या कंपनीला दिली आहे. दादर किनारपट्टीचा उल्लेख यासाठी करतोय की, ही किनारपट्टीची पाहणी स्वत: पायी फिरुन मी केली आहे. दादरजवळचा वाळूचा प्रदेश संपल्यातच जमा आहे.

पुण्याच्या शनिवारवाडयातील खोल्या मध्यंतरी जळून खाक झाल्या होत्या त्या खोल्यांची प्रतिकृती तयार करण्याची आणि रायगड किल्ल्यातील ऐतिहासिक साहित्याची प्रतिकृती तयार करावी असा प्रस्ताव मी दिल्लीला घेवून गेलो होतो असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

ऐतिहासिक वास्तूंचे रिस्टोरेशन कशापध्दतीने करायचे यासाठीचे काम पीडब्लूडीकडे न देता ते काम ऐतिहासिक वास्तू तज्ज्ञांकडून करुन घ्यायला हवे असे मतही जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

ब्रिटीशांनी मुंबईमध्ये इमारती उभारल्या त्या मुंबईच्या शान आहेत. मी मुंबईचा पालकमंत्री असताना २००६-२००७ मध्ये मुंबईतील जुन्या वास्तूंचे रिस्टोरेशन करुन घेतले आहे.

पर्यटनामध्ये सुधारणा करताना मास्टर प्लॅन तयार करा आणि त्यामध्ये सर्वांना विश्वासात घ्या असा सल्ला जयंत पाटील यांनी सरकारला दिला.

जयंत पाटील यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मजबुतीबाबतचा मुद्दा समोर आणला. समुद्री पाण्यामुळे किल्ल्याचे दगड झिजत चालले आहेत. त्यांचे जॉईंट त्यामुळे दिसत असून त्यावेळी किती पक्क बांधकाम होतं हे लक्षात येतं. त्यामुळे या किल्ल्याची सुधारणा करण्याची व वारसा जपण्याची गरज आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

त्यांनी मुंबईमध्ये होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय पुतळयाचा मुद्दा उपस्थित केला. या स्मारकाला पहिल्यांदा पर्यटकांनी भेट दयावी अशा पध्दतीचे काम व्हायला हवे असेही जयंत पाटील यांनी सांगितले. त्यांनी आपल्या भाषणामध्ये राज्यातील पर्यटनाच्या मुद्दयाला हात घालताना पर्यटनाचा दर्जा कशापध्दतीने वाढला पाहिजे हेही सरकाच्या लक्षात आणून दिले

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!