मुंबई : शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे अशी जहरी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बहुजन समाजावर अन्याय केल्याचा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधी सकारात्मक नसून फक्त राजकारण करत आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
लढाई जिंकणारच : राज्यात एका दिवसात बरे झालेल्या रुग्णांची ‘विक्रमी’ संख्या…
शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे असं पडळकर म्हणाले आहेत.
पडळकर यांनी केलेल्या या टीकेनंतर वादाला तोंड फुटलं आहे. पडळकर यांच्या या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने देखील आता या वादात उडी घेतली आहे. वादग्रस्त विधानं करून सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता आमदार गोपिचंद पडळकर यांनी जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे असा सल्ला शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि आमदार मनीषा कायंदे यांनी दिला आहे.
पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांनी आषाढी एकादशीला पंढरपुरात पूजेसाठी येवू नये असं वक्तव्य केलं होतं त्याचा देखील कायंदे यांनी साम बरोबर बोलताना समाचार घेतला. पडळकर हे नव्याने विधान परिषदेवर निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनी सांभाळून टीका केली पाहिजे. त्यांनी ज्या पद्धतीने शरद पवार यांच्याविरोधात टीका केली आहे. त्याप्रमाणे ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका करीत आहेत. वास्तविक पुजा करण्याबाबतचा निर्णय मंदीर समिती घेत असते. आजपर्यंत अनेक मुख्यमंत्र्याच्या हस्ते पुजा करण्यात आल्या आहेत. तसेच सामान्य वारकऱ्यांनीही पुजा केली आहे. त्यामुळे पुजा करण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील यामध्ये गोपिनाथ पडळकर यांनी अशा भानगडीत पडू नये असा सल्ला कायंदे यांनी त्यांना दिला आहे.
पडळकर ही धनगर समाजाची नाही, तर आरएसएसवाल्याची औलाद – पाटील
भाजपने पडळकर यांचं पवारांबाबत केलेलं वक्तव्य चुकीचं असल्याचं सांगत, या प्रकरणातून हात झटकले आहेत. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील गोपीचंद पडळकर यांच्याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवार हे आपले राजकीय विरोधक आहेत शत्रू नाहीत अस आपण पडळकर यांना समजावून सांगितल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

